आ. तानाजी सावंत यांनाच पालकमंत्री करा | पुढारी

आ. तानाजी सावंत यांनाच पालकमंत्री करा

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार अचानक पायउतार झाल्यानंतर नव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नव्याने सकार स्थापन झाले असून लवकरच या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. त्यामुळे नव्याने होणार्‍या मंत्री मंडळात भुम परांड्याचे शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीमंउळात स्थान द्यावे तसेच त्यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी द्यावी, अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मनिष काळजे आणि माजी जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी केली आहे.

राज्यातील मंत्रीमंउळ बरखास्त झाल्यानंतर तसेच नव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्या नंतर राज्यातील राजकीय समिकरणे झपाट्याने बदलत चालली आहेत.तसेच सोलापूर जिल्हा शिवसेनेत ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांची गोची करण्यात आली असून अनेकांना शिवसेनेने संघटनेतून विविध पदावरून पाय उतार केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांची मोठी आडचण सोलापूर जिल्ह्यात झाली आहे.त्यामुळे नव्याने होणार्‍या मंत्रीमंडळामध्ये पूर्वीचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आ तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे तसेच त्यांनाच सोलापूरचे पालकमंत्री करावे अशी मागणी जिल्ह्यताील एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

सध्या सावंत हे भूम पराड्याचे आमदार असले तरी उस्मानाबाद जिल्ह्यात आ. ज्ञानराज चौगुले हे चार टर्म आमदार आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले तर आ तानाजी सावंत यांना सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सोलापुरातील एकनाथ शिंदे समर्थक युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मनिष काळजे आणि माजी शिवेसेना जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही मागणी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतल्यास तानाजी सावंत हे सोलापूरचे पालकमंत्री होऊ शकतात, असा विश्वास ही व्यक्त करण्यात येत आहे.

Back to top button