सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे ४ मेपर्यंत काढण्याचे आवाहन केले हाेते. यानंतर मनसे कार्यकर्ते ते भोंगे काढतील, तसेच हनुमान चालीसा पठण करतील, असा इशाराही त्यांनी दिला हाेता. या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी कलम 149 नुसार नोटीस देण्यात आल्या आहेत.
मनसे पदाधिकारी दिलीप धोत्रे यांना पंढरपूर शहर पोलिसांनी नोटीस दिली आहे. त्यांच्यासोबत अनेक मनसैनिकांना देखील ही नोटीस बजावण्यात आली आहे. दिलीप धोत्रे आणि मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. धोत्रेंच्या निवासस्थाना समोर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.