सोलापूर : रामवाडी येथे गॅस सिलिंडरचा काळा बाजार करणार्‍यावर धाड - पुढारी

सोलापूर : रामवाडी येथे गॅस सिलिंडरचा काळा बाजार करणार्‍यावर धाड

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : रामवाडी येथे घरगुती गॅसचा वापर चोरुन वाहनांसाठी करणार्‍यास ताब्यात घेऊन 4 लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मनोज लक्ष्मण जाधव (रा. लिमयेवाडी) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

रामवाडी येथे एकजण घरगुती गॅसचा वापर हा बेकायदेशीररीत्या करुन त्या गॅसचा वापर जास्त पैसे घेऊन रिक्षात भरत असल्याची माहिती मिळताच सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंद्रजित वर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार माने व त्यांच्या पथकाने त्याठिकाणी धाड टाकली.

त्यावेळी मनोज जाधव हा एमएच 13 बीबी 0539 या क्रमांकाच्या रिक्षात अवैधरित्या गॅस भरताना आढळून आला. यावेळी पोलिसांनी 1 गॅस टाकी, 1 इलेक्ट्रिक मोटार, 1 इलेक्ट्रिक वजनकाटा व 4 रिक्षा, असा 4 लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

मनोज जाधव याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणार्‍याविरुद्ध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button