औषधे खरेदी करताना प्रामुख्याने त्यावरील एक्सपायरी डेट चेक केली जाते. याशिवाय दूध किंवा इतर नाशवंत पदार्थ यांची शेल्फ लाईफही खरेदीपूर्वी चेक केली जाते. अनेकांना या दोन्ही संज्ञा सारख्याच वाटतील. पण तुम्हाला माहिती आहे का या दोन्ही मध्ये बारीकसा फरक आहे. तुम्ही पदार्थावरील used before वाचून तो फेकून देत असाल तर त्यापूर्वी हे वाचा.
हा क्वालिटीशी जोडलेला इंडिकेटर आहे. याचा अर्थ पॅकेटवरील तारखेनंतरही पदार्थ खाण्यास योग्य आहे. पण या तारखेनंतर त्याच्या चवीत, पोषणमूल्यात आणि वासात बदल होऊ शकतो असा त्याचा अर्थ आहे.
ही संज्ञा शक्यतो नाशवंत पदार्थासाठी वापरली जाते. यामध्ये दूध, इतर डेयरी प्रॉडक्ट, मांस यासारख्या पदार्थांचा समावेश होतो.
याचा सर्वांना माहिती असलेला अर्थ म्हणजे या तारखेनंतर प्रॉडक्ट वापरू नये. वापरल्यास उत्पादकाची जबाबदारी राहणार नाही असा त्याचा गर्भित अर्थ आहे.
पॅकेज्ड फूड, बाटलीबंद पाणी, कोल्ड ड्रिंक्स, कॉस्मेटिक्स, औषधे, मौखिक आरोग्याशी संबंधित वस्तू
अनेकदा कळत नकळत Expiry date उलटून गेलेली वस्तू वापरल्यास अनेक त्रासांना सामोरे जावे लागू शकते. यामध्ये रॅश, अतिसार, पोटदुखी, फूड पॉयझनिंग असे त्रास होऊ शकतात.