भारतातील ही ऐतिहासिक मंदिरं आहेत Destination wedding spot

काही दिवसांत लग्नाचा सीझन पुन्हा सुरू होतो आहे
minakshi amman mandir
मीनाक्षी अम्मन मंदिर Pudhari
Published on
Updated on

येत्या काही दिवसांत लग्नाचा सीझन पुन्हा सुरू होतो आहे. लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण. हा क्षण अजून खास बनवण्यासाठी वधू - वर आणि त्यांच्या घरचे अनेकदिवस प्लॅनिंग करत असतात. पेहराव, दागिने, तारिख या महत्वाच्या घटकासोबतच अजून एक गोष्ट अत्यंत बारकाईने निवडली जाते ती म्हणजे wedding destination. अलीकडच्या काही वर्षात डेस्टीनेशन वेडिंगचा ट्रेंड चांगलाच रूजला आहे. अनेकजण यासाठी निसर्ग रम्य ठिकाणं निवडतात. पण भारतासारख्या देखण्या मंदिराच्या देशात हा ऑप्शन मागे पडतो.

भारतातील अनेक देखणी मंदिरं गतवैभवाची साक्ष देत दिमाखात उभी आहेत. या मंदिरांची destination wedding म्हणून निवड करत असाल तर लग्नाला स्पेशल traditional टच मिळून जाईल हे नक्की. ही आहेत भारतातील प्रसिद्ध मंदिरे :

सिद्धिविनायक मंदिर :

मुंबई मधील सिद्धिविनायक मंदिर माहीती नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. या मंदिरात लग्नासाठी अतिशय परफेक्ट आहे.

siddhivinayak mandir
siddhivinayak mandir

मीनाक्षी अम्मन मंदिर, मदुरई :

meenakshi amman mandir
meenakshi amman mandirPudhari

सुंदर गोपुरांसाठी प्रसिद्ध असलेलं मीनाक्षी अम्मन मंदिर परफेक्ट wedding destination आहे. याशिवाय मंदिराच्या आसपासचे वातावरण आणि नक्षीकाम या सर्वात भरच घालते.

कोणार्क सूर्य मंदिर, ओडिशा :

उत्तम नक्षीकामाचा नमूना असलेलं हे मंदिर पर्यटकांच खास लाडकं आहे. हे मंदिर त्याच्या उत्तम स्थापत्यासाठी खास प्रसिद्ध आहे. तेराव्या शतकातील या मंदिराची wedding destination म्हणून निवड ही उत्तम निवड ठरेल यात शंका नाही.

Konarka_Temple
Konarka_Temple

काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी :

kashi vishwanath mandir
kashi vishwanath mandir

12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या मंदिराचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व वादातीत आहे. या मंदिराच्या पवित्र वातावरणात तुम्ही नव्या आयुष्याला सुरुवात करू शकता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news