सांगली : ‘मॉडेल स्कूल अभियान’: पन्नास शाळांचा होणार कायापालट

सांगली : ‘मॉडेल स्कूल अभियान’: पन्नास शाळांचा होणार कायापालट
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या 50 शाळांसाठी 'मॉडेल स्कूल अभियान'ची घोषणा महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस यांनी पत्रकार परिषदेत केली. पहिली 'मॉडेल स्कूल' म्हणून मिरज येथील शाळा नंबर 19 ची निवड केली आहे. महापालिका व संस्था, लोकसहभागातून 1 कोटीतून भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध केल्या जाणाार आहे. या शाळेचा कायापालट होणार आहे, अशी माहिती सूर्यवंशी व कापडणीस यांनी दिली.

स्थायी सभापती निरंजन आवटी, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, महिला व बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे-पाटील, आभाळमाया फाऊंडेशनचे प्रमोद चौगुले, नगरसेवक उत्तम साखळकर, रोहिणी पाटील, शुभांगी साळुंखे, नसीमा नाईक, नगरसचिव चंद्रकांत आडके उपस्थित होते.

सर्व 50 शाळा होणाार मॉडेल

कापडणीस म्हणाले, महापालिकेच्या 50 शाळा आहेत. या शाळांचा परिसर मोठा आणि प्रशस्त आहे. मागील काही महिन्यापासून महापालिका शाळांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. शाळांच्या गुणवत्ता वाढीवर व भौतिक सुविधांवर विशेष लक्ष दिले आहे. पहिली शाळा मॉडेल झाल्यानंतर टप्प्याटप्याने महापालिकेच्या उर्वरीत सर्व शाळा 'मॉडेल स्कूल' केल्या जाणार आहेत. यावर्षी शाळांसाठी 5 कोटींची तरतूद केली आहे.
मॉडेल स्कूलसाठी या सुविधा..!

पहिली मॉडेल स्कूल म्हणून मिरजेतील शाळा क्रमांक 19 ची निवड केली आहे. या शाळेला लोकसहभागातून प्रवेशद्वार, सुरक्षा भिंत, खेळाचे मैदान, पुरेशी स्वच्छतागृहे, बगिचा यासह दोन मजली आदर्श शाळा तयार करण्यात येणार आहे. संगणक सज्जता, डिजिटल क्लासरूम, सायन्स लॅब, ग्रंथालय व वाचनालय, स्पोर्टस् रूम म्युझिक आर्ट रूम असणार आहे. या स्कूलला बसची व्यवस्थाही उपलब्ध केली जाणार आहे. बालवाडीसाठी स्वतंत्र वर्ग, खेळणी, सोलर सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे, शुद्ध पिण्याचे पाणी, हँडवॉश स्टेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत.

मॉडेल स्कूल पिवळ्या रंगात

जयपूर पिंक सिटीच्या धर्तीवर सांगली 'यलो सिटी' बनवण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी पुढाकार घेतला आहे. महापालिकेची शाळा नंबर 19 ही पहिली मॉडेल स्कूल पिवळ्या रंगात रंगविली जाणार आहे.

पगारातून 25 लाख; पदाधिकारी देणार मानधन रक्कम शाळा नंबर 19 ला 'मॉडेल' स्कूल बनवण्यासाठी 1 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातील 25 लाख रुपये महापालिका अधिकारी आणि कर्मचारी एका दिवसाच्या पगारातून देणार आहेत. याशिवाय महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक मानधनाची रक्कम देणार आहेत.

शाळा खोली, प्रवेशद्वाराला आवडत्या व्यक्तीचे नाव

नागरिक, संस्था आपल्या आवडत्या व्यक्तींची स्मृती/आठवण म्हणून ते इच्छुक असलेल्या शाळेचा कोणताही भाग विकसित करू शकतील. प्रवेशद्वार, शाळा खोली, संगणक, एलईडीसंच, सायन्स लॅब, स्पोर्ट्स रूम, आर्ट सेंटर, सीसीटीव्ही यंत्रणा, वॉटर प्युरीफायर फर्निचर आदी विकसित करून दिल्यास या बदल्यात त्यांच्या आवडत्या व्यक्तीचे नाव त्या ठिकाणी प्रदर्शित करण्याची परवानगी देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news