विमानातही असतात हॉर्न!

विमान
विमान
Published on
Updated on

नवी दिल्ली ः रस्त्यावरून जात असताना अनेक प्रकारच्या वाहनांच्या हॉर्नचे आवाज ऐकून आपण त्रस्त होत असतो. अशा हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषणही होत असते. रुग्णालयांसारख्या काही ठिकाणांच्या परिसरात 'नो हॉर्न झोन'ही असतो. असा हॉर्न विमानामध्येही असतो का, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. विमानातही हॉर्न असतो; पण तो ग्राऊंड इंजिनिअर आणि कर्मचार्‍यांशी संपर्क साधण्यासाठी तसेच कोणत्याही धोक्याची सूचना देण्यासाठी वापरला जातो.

उड्डाण करण्यापूर्वी विमानात काही बिघाड झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास विमानात बसलेला पायलट किंवा अभियंता हा हॉर्न वाजवून ग्राऊंड इंजिनिअरला अलर्ट मेसेज पाठवतो. या हॉर्नचे बटण विमानाच्या कॉकपिटवर असते. हे कॉकपिट कंट्रोल्समधील इतर बटणांसारखेच आहे. ज्यामुळे ते शोधणे कठीण होते. या बटणाच्या वर 'जीएनडी' (ग्राऊंड) असे लिहिलेले असते. हे बटण दाबल्यावर विमानातील अलर्ट सिस्टीम सुरू होते आणि सायरनसारखा आवाज येतो.

विमानातील हॉर्न लँडिंग गिअर कंपार्टमेंटमध्ये बसवले जाते. विशेष म्हणजे विमानांमध्ये स्वयंचलित हॉर्नही असतात. ते सिस्टीममध्ये बिघाड किंवा आग लागल्याने आपोआप आवाज करतात. विशेष म्हणजे या हॉर्नचा आवाजही वेगळा असतो, जो वेगवेगळ्या सिस्टीममधील दोषानुसार वेगवेगळ्या आवाजात वाजतो. यामुळे विमान अभियंत्यांना जहाजाच्या कोणत्या भागात बिघाड झाला आहे हे शोधता येते. विमानात असताना वैमानिक हॉर्न वाजवू शकत नाही, याचे कारण म्हणजे त्यावेळी विमानाची इशारा यंत्रणा बंद असते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news