मुंबई : घाट रस्त्यांची कामे युद्धपातळीवर करणार

Published on
Updated on

मुंबई ,  पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे राज्यातील घाटमाथ्यावर रस्त्यांची दुरवस्था होते. त्यामुळे घाटमाथ्यावरील रस्ते आणि संरक्षक भिंती बांधण्याची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राधान्याने निधी देऊन युद्धपातळीवर हाती घेतली जातील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले. राज्यातील घाटमाथ्यावरील रस्त्यांची दुरवस्था आणि सातत्याने होणार्‍या अपघातांकडे दै. 'पुढारी'ने दीर्घ मालिकेद्वारे लक्ष वेधले होते. त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेत उपाययोजनाही सुरू केल्याचेही चव्हाण यांनी आवर्जून सांगितले.

प्रश्न : भुईबावडा घाटमार्गात रस्ता खचला आहे. संरक्षक कठडे कोसळले आहेत.

चव्हाण ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भुईबावडा घाटातील रस्ता खचल्याने हा रस्ता अवजड वाहनांसाठी बंद केला आहे. डागडुजी करून तो छोट्या वाहनांसाठी खुला केला. या रस्त्याची पाहणी सीआरआरआय दिल्लीच्या संस्थेने केली आहे. सध्या हा रस्ता शेतकर्‍यांच्या मागणीमुळे एकमार्गिकेने ऊस वाहतुकीसाठी सुरू केला आहे.

प्रश्न : तात्पुरती डागडुजी नको. कायमच्या उपाययोजना काय करणार?
चव्हाण ः विशेष पूरहानी अंतर्गत या वर्षी दरडी काढण्यासाठी 23 लाख रुपये मंजूर केले आहेत. घाट सुरक्षेसाठी संरक्षक भिंत, ब्रेस्ट वॉल, काँक्रिट गटारीसाठी 3 कोटी रुपये देण्यात येतील. केंद्रीय मार्ग निधीतून घाट सुधारणा रुंदीकरण आणि डांबरीकरणासाठी 41 कोटी रुपये देऊन हे काम तातडीने मार्गी लावू.

प्रश्न : आंबा घाट बंद झाल्याने गेल्या पावसाळ्यात अणुस्कुरा घाटावर वाहतुकीचा ताण वाढला होता. तेथे कायम दरडी कोसळतात…
चव्हाण ः आंबा घाट पावसाळ्यात बंद झाल्यानंतर अणुस्कुरा घाटातून वाहतूक वळविण्यात आली होती. रत्नागिरीकडे असलेल्या या घाटाची लांबी वाढविण्याचे काम हाती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. अणुस्कुरा घाटाच्या कोल्हापूरकडील रस्त्याच्या लांबीचे काम पूर्ण झाले आहे.

प्रश्न : फोंडा घाटातील रस्त्याची दुर्दशा आहे. मंजूर कामेही सुरू नाहीत…?
चव्हाण ः या घाटातील देवगड – निपाणी मार्गावर रिटेनिंग वॉल व ब्रेस्ट बांधणे तसेच सुरक्षेसाठी कॅट आईज बसविण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी 37 लाख रुपये मंजूर आहेत. विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत लांबी वाढविण्याचे काम मंजूर आहे. त्याचे नूतनीकरण पूर्ण झाले असून देवगड-निपाणी रस्त्यातील सिल्प सर्कलचे काम निविदा पातळीवर आहे.

प्रश्न : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणार्‍या आंबेनळी घाटाची अक्षरशः चाळण झाली आहे.
चव्हाण ः अतिवृष्टीने घाटात 22 ठिकाणी दरडी कोसळल्या. रस्ताही तुटला. तेथे राज्य सरकारने 15 कोटींंची कामे मंजूर केली आहेत. संरक्षक भिंतीसह अन्य कामे दोन महिन्यात पूर्ण करणार आहोत. घाटातील रस्त्याचे डांबरीकरण आणि रस्ता नूतनीकरणासाठी 35 कोटी रुपयांची काम सुरू आहेत.

प्रश्न : अनेक घाटांत संरक्षक कठडे कोसळले आहेत. कुंभार्ली घाटातही संरक्षक कठडे कोसळलेले आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कायमस्वरूपी उपाययोजना होऊ शकते का?
चव्हाण ः तसा विचार सुरू आहे. अनेक अपघात हे संरक्षक कठडे नसल्यामुळे होतात. पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारे काही रस्ते वाहतुकीस बंद असल्याने या घाट रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक सुरू आहे. तेथे 22 कोटींचा निधी देऊन आवश्यक संरक्षित उपाययोजना केल्या जाणार आहेत.
विटा, पेठ, मलकापूर, अणुस्कुरा, साटवली, पावस रस्त्यासाठी 47 कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच या घाटातील संरक्षक कठडे आणि रोड मार्किंगसाठी 50 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

प्रश्न : महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांना जोडणार्‍या तिलारी घाटात अपघाताचे प्रमाण जास्त आहे. घाटातील रस्त्याचे रुंदीकरण झाले तर घाट मार्ग सुरक्षित होईल.
चव्हाण ः हा घाट रस्ता वनक्षेत्रातून जातो. तीव्र वळणे व तीव्र उतार असल्याने येथे रुंदीकरण, वळणे आणि तीव्र उतार या बाबींमध्ये सुधारणा करण्यास मर्यादा आहेत. तेथे वनविभागाची मंजुरी मिळातच संरक्षक भिंतीची फेरबांधणी केली जाईल. मोर्ले-पारगड या घाट रस्त्याच्या कामालाही निधीची तरतूद आहे.

प्रश्न : पावसाळ्यात आंबोली घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण जास्त असते. त्याविषयी…?
चव्हाण ः या घाटात संरक्षक भिंती बांधल्या आहेत. तडे गेलेले धोकादायक खडक काढले आहेत. आंबोली घाटातील कमानी पुलाची दुरुस्ती केली आहे. आणखी संरक्षक कठडे बांधण्याची तरतूद करू.वन जमीनी मुळे रस्ता रुंदीकरण शक्य नाही. संकेश्वर ते नांगरतासपर्यंतचे काम लवकरच सुरू होईल. उर्वरित आंबोली घाट ते बांदा, सावंतवाडी दरम्यानचा डीपीआर मंजुरीसाठी राष्ट्रीय महामार्गाकडे सादर केला आहे. आंबोली घाटात दरडी पडलेल्या ठिकाणी वेब जाळी बसविण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजूर केले आहे.

काँक्रिट गटारीसाठी 3 कोटी रुपये देण्यात येतील. केंद्रीय मार्ग निधीतून घाट सुधारणा रुंदीकरण आणि डांबरीकरणासाठी 41 कोटी रुपये देऊन हे काम तातडीने मार्गी लावू.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news