बेळगाव : राष्‍ट्रीय महामार्गावर अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थी ठार

बेळगाव : राष्‍ट्रीय महामार्गावर अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थी ठार
Published on
Updated on

बेळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा : राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला दुचाकीने जोराची धडक दिली. या अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाले. यामध्ये मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांचे चिरंजीव श्रीनाथ यांचा समावेश आहे. अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाल्‍याच्या घटनेने शहरावर शाेककळा पसरली आहे.

पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बर्डे धाब्याशेजारी काल (बुधवार) मध्यरात्री बाराच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. ऐन गणेशोत्सवाच्या दिवसात घडलेल्या या घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली आहे.

श्रीनाथ दिगंबर पवार (वय 21 रा. चव्हाट गल्ली ) आणि रचित रंजन डूमावत (वय 21 सदाशिवनगर) अशी अपघातात मृत्‍यू मुखी पडलेल्‍या युवकांची नावे आहेत. श्रीनाथ हा येथील लिंगराज कॉलेजमध्ये बी .कॉमचे शिक्षण घेत होता. श्रीनाथ याच्या पश्चात आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. सकाळी 11 वाजता चव्हाट गल्ली स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news