कृषी उत्पन्न बाजार समिती : राज्यात २६४ बाजार समित्यांच्या निवडणुका

कृषी उत्पन्न बाजार समिती : राज्यात २६४ बाजार समित्यांच्या निवडणुका
Published on
Updated on

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात 264 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा धडाका सुरू होत आहे. कोरोनामुळे रखडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका आता मार्गी लागल्या असून, बाजार आवारांमधील वातावरण हळूहळू निवडणूकमय होण्यास सुरुवात होणार आहे. निवडणुका होणार असलेल्या सर्वाधिक 15 बाजार समित्या नाशिक जिल्ह्यातील, तर 14 समित्या नगर जिल्ह्यातील असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले.

नांदेड, बुलडाणा, नागपूर या जिल्ह्यांतील प्रत्येकी 13 समित्या, तर अमरावती, यवतमाळ, जळगावमधील प्रत्येकी 12 समित्यांच्या निवडणुका होत आहेत. निवडणूक होणार्‍या आणि 31 डिसेंबर 2019 पर्यंत मुदत संपलेल्या बाजार समित्यांची संख्या 241 आहे, तर 23 ऑक्टोबरनंतर मुदत संपलेल्या बाजार समित्यांची संख्या 23 आहे.

जिल्हानिहाय यादी पुढीलप्रमाणे :

ठाणे : उल्हासनगर, शहापूर.

पालघर : वसई, पालघर, डहाणू (17 डिसेंबर 2021).

रत्नागिरी : रत्नागिरी.

रायगड : महाड, अलिबाग, पेण, रोहा, खालापूर, कर्जत, माणगाव, पनवेल (13 नोव्हेंबर 2021).

सिंधुदुर्ग : कुडाळ.

नाशिक : सुरगणा, उमराणे, देवळा, घोटी बु., पिंपळगाव बु., चांदवड, नाशिक, येवला, नांदगाव, सिन्नर, कळवण, मनमाड, मालेगाव, लासलगाव, दिंडोरी.

जळगाव : जामनेर, यावल, चाळीसगाव, अंमळनेर, जळगाव, पारोळा, चारोरा, बोधवड, रावेर, धरणगाव, भुसावळ, चोपडा.

अहमदनगर : जामखेड, संगमनेर, राहुरी, कर्जत, नेवासा, श्रीरामपूर, शेवगाव, राहाता, कोपरगाव, श्रीगोंदा, अहमदनगर, पाथर्डी, अकोले, पारनेर.

सोलापूर : अक्कलकोट, सांगोला, मोहोळ, माळशिरस (17 नोव्हेंबर 2021), माढा (18 नोव्हेंबर 2021), दुधनी (22 नोव्हेंबर 2021).

कोल्हापूर : कोल्हापूर, गडहिंग्लज, पेठवडगाव, जयसिंगपूर.

सांगली : आटपाडी, इस्लामपूर, तासगाव, पलूस, शिराळा, सांगली, विटा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news