ऐश्वर्या राय घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण

Aishwarya rai
Aishwarya rai
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमाला देशविदेशातील सेलिब्रिटींनी हजेरी होती. यावेळी ऐश्वर्या आणि आराध्या देखील उपस्थित होत्या. या दोघींसोबत अभिषेक नव्हता. दोघींच्या फोटोवर चाहत्यांनी अनेक कॉमेन्टस केल्या.
या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खान उपस्थित होता. कार्यक्रमातील एका व्हिडीओने मात्र, चाहत्यांना थक्क केले.

त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक वर्षांनंतर सलमान आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले. सलमान खान आणि ऐश्वर्या रायला असे एकत्र पाहून चाहते खूश झाले. मात्र त्यांचा हा आनंद काही क्षणासाठी होता. कारण दोघांना व्हिडिओ एडिट केलेला आहे. तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाचीही चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

या घटस्फोटाच्या चर्चांनी सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या जोडीला पसंत करणारे चाहते, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित करत आहेत. खरे तर बॉलीवूडमधील सर्वात रॉयल कपल म्हणून ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांची ओळख आहे. त्यांनी २००७ साली लग्न केले. लग्नानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याबद्दल याआधीही अनेक चर्चा रंगल्या. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक अनेक वर्ष चर्चेत राहिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news