Warren Buffett & AI: वॉरेन बफे यांनी ‘AI’ वर व्यक्त केली चिंता; म्हणाले ‘AI’ म्हणजे ‘ॲटम बॉम्ब’

Warren Buffett & AI
Warren Buffett & AI
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील प्रख्यात गुंतवणूकदार आणि उद्योगपती वॉरेन बफे यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) संदर्भात मोठी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी जगाच्या बाजारपेठेत नव्याने आलेल्या AI ची तुलना ॲटम बॉम्बसोबत केली आहे. (Warren Buffett & AI) . अमेरिकेतील नेब्रास्का येथे झालेल्या कंपनीच्या वार्षिक बैठकीत चर्चेदरम्यान त्यांनी ही भीती व्यक्त केली आहे.

यावेळी वाॅरेन बफे यांनी म्हटले आहे की, " आर्टिफिशिअल इंटेलिजन्स जगातील प्रत्येक गोष्ट बदलेल. जेव्हा एखादी गोष्ट सर्व प्रकारच्या गोष्टी करू शकते, तेव्हा मला थोडी काळजी वाटते. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापर वाढत जाईल, तशी तुलना वाढेल आणि हे तंत्रज्ञान एक दिवस ॲटम बॉम्बची निर्मिती करेल, याची मला भीती वाटते. यामुळे मी चिंतेत (Warren Buffett & AI) आहे."

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हा या वर्षी चर्चेचा शब्द बनला आहे. ChatGPT सारखे ॲप्स् लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. युजर्सकडून 'एआय'(AI) चॅटबॉट्स विविध कामांसाठी वापरले जात आहेत. यावर अनेक दिग्गज टेक कंपनीच्या प्रमुखांनी आपले मत व्यक्त करत, या तंत्रज्ञानाविषयी चिंता व्यक्त केली आहे. (Warren Buffett & AI) दरम्यान, तंत्रज्ञान क्षेत्रात नेहमी चर्चेत असलेले ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी देखील AI मुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील, अशी भीती व्यक्त केली होती.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news