मॉस्को, पुढारी ऑनलाईन : रशियातील प्रायव्हेट मिलिटरी असलेल्या वॅगनर गटाने ( Wagner mercenary group) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या (Russian President Vladimir Putin) विरोधात बंड पुकारले आहे. रशियन सैन्याचे मुख्यालय ताब्यात घेतल्याचा दावा वॅगनर गटाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन (Yevgeny Prigozhin) यांनी केला आहे. दरम्यान, रशियामध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. इंटरनेटवर निर्बंध घालण्यात आले आहेत आणि मॉस्कोच्या रस्त्यावर लष्करी हालचाली वाढल्या आहेत. दरम्यान, रशियाने प्रिगोझिन यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. (Russia-Ukraine news) तसेच मॉस्को आणि या प्रदेशात दहशतवादविरोधी कारवाईची घोषणा रशियाने केली आहे.
शनिवारी सकाळी पहाटे वॅगनर गटाचे सैन्य रशियातील रोस्तोव-ऑन-डॉन शहरात दाखल झाल्याचे व्हिडिओ समोर आले. एका व्हिडिओमध्ये पोलिस मुख्यालयाच्या सभोवतालच्या परिसरात सशस्त्र सैन्यांचा ताफा दिसून आला. यामुळे मास्कोतून रशियन सैन्याला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. (wagner chief news)
वॅगनर गटाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी शनिवारी जाहीर केले की ते दक्षिण रशियाच्या रोस्तोव-ऑन-डॉन येथील लष्कराच्या मुख्यालयात दाखल झाले आहेत आणि त्यांच्या फायटर्सनी सैन्यांच्या ठिकाणांवर ताबा मिळवला आहे. त्यांच्या सैन्याने पुतिन यांची सत्ता हटविण्यासाठी रशियामध्ये प्रवेश केला असल्याचेही प्रिगोझिन यांनी म्हटले आहे. दरम्यान, क्रेमलिन सरकारने प्रिगोझिनच्या अटकेचे आदेश दिले आहेत आणि बंडखोरीला चिथावणी दिल्याबद्दल त्याची चौकशी केली जात आहे.
प्रिगोझिन यांनी रशियाच्या लष्करातील उच्चपदस्थ नेत्यांवर युक्रेनमधील युद्धात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. प्रिगोझिन यांनी शुक्रवारी काही प्रक्षोभक व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग सार्वजनिक केले होते. ज्यामध्ये त्यांनी रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांच्यावर युक्रेनमधील वॅगनरच्या फील्ड कॅम्पवर रॉकेट हल्ल्याचा आदेश दिल्याचा आरोप केला आहे. जिथे त्यांचे सैन्य रशियाच्या बाजून लढत आहे.
रशियन सैन्य आणि वॅगनर गटात संघर्ष पेटला आहे. दरम्यान, युक्रेन सीमेजवळील शहरातील रहिवाशांना शांत राहण्यास आणि घरात राहण्यास सांगितले आहे. (Russia-Ukraine news)
हे ही वाचा :