UP Muslim Education : उत्तर प्रदेशाच्या मदरशांमध्ये मार्चपासून NCERT अभ्यासक्रम

UP Muslim Education : उत्तर प्रदेशाच्या मदरशांमध्ये मार्चपासून NCERT अभ्यासक्रम
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमधील (UP) मदरसा बोर्डमध्ये मार्चपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरु होणार आहे. या नवीन शैक्षणिक सत्रापासून राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचा (NCERT) अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. (Muslim Education)

मदरसा शिक्षण परिषदेचे अध्यक्ष इफ्तिखार अहमद जावेद यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांना आता धार्मिक शिक्षणासोबत आधुनिक शिक्षण दिले जाणार आहे. या बदलामुळे आता मदरशातील मुले संगणक, गणित आणि विज्ञान शिकू शकतील. त्याचबरोबर मदरशात सकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत एक तास धार्मिक शिक्षण दिले जाईल. (UP Muslim Education)

सप्टेंबरमध्ये, उत्तर प्रदेश सरकारने निधीचा स्रोत, शिक्षकांची संख्या, अभ्यासक्रम, इतर तपशीलांसह माहिती गोळा करण्यासाठी सर्व मदरशांचे सर्वेक्षण सुरू केले होते.

 उत्तराखंडमध्ये देखील चालवली जाणार NCERT मोहीम (UP Muslim Education)

नोव्हेंबरमध्ये उत्तराखंडमधील वक्फ बोर्डाने राज्यभर चालवल्या जाणाऱ्या सर्व १०३ मदरशांमध्ये NCERT अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेतला होता. उत्तराखंड वक्फ बोर्डाने देखील या वर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून निर्णय घेतला आहे की, मदरसे सर्व धर्मांच्या मुलांसाठी खुले असतील आणि इस्लामिक शाळांमधील शिक्षणाचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून एकसमान गणवेश (Dress Code) लागू केला जाईल.

उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, "मदरशातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न याला आम्ही सर्वप्रथम प्राधान्य देणार आहोत. "आम्ही येत्या काही वर्षांत CBSE [Central Board of Secondary Education] किंवा उत्तराखंड स्टेट बोर्डाची मदरशांसाठी संलग्नता मिळवण्याचा प्रयत्न करू."

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news