Love Jihad : लव्ह जिहादचे लोण संगमनेरपर्यंत ! दोन परप्रांतीयांना केले गजाआड

file photo
file photo
Published on
Updated on

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : इंस्टाग्राम आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून बिहार राज्यातून आलेल्या दोघांनी संगमनेर तालुक्यातील एका महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुलीच्या धाडसांमुळे त्या परप्रांतीय तरुणांचा लव्ह जिहाद करण्याचा प्रयत्न फसला. अखेर परिसरातील नागरिकांच्या मदतीने दोघा परप्रांतीय तरुणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्याततील खांडगाव परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीशी बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील परप्रांतीय तरुणाने इंस्टाग्राम आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून ओळख वाढविली. गेल्या दोन वर्षापासून ते एकमेकांशी संपर्कात होते. त्यामुळे दोघांचे भेटण्याचे ठरले. त्यानुसार हा तरुण संगमनेरला आला. काल सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कासारा रोड ते खांडगाव या रस्त्यावर त्याने तिला घेऊन जात असताना तो तिला म्हणाला, 'तु मला खुप आवडतेस, मला तुझ्याबरोबर लग्न करायचे आहे.

तू माझ्या बरोबर माझ्या गावाकडे चल', तू आली नाहीस तर तुला पळवून घेऊन जाईल, असा दमही त्याने तिला दिला. ती नाही म्हणताच त्याने तिचा हात धरून ओढत नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्या मित्रानेही त्याला यासाठी मदत केली. त्यावेळी या मुलीने आरडाओरड केल्यामुळे काही लोक तेथे आले आणि त्यांनी त्या युवतीला सोडवले.

याबाबत महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अक्रम शहाबुद्दीन शेख, रा. अलीनगर जि. दरभंगा, बिहार आणि त्याचा एक मित्र नेमतुल्ला या दोघा परप्रांतीय तरुणांच्या विरोधात अपहरणाचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्या दोघांनाही अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार हे करत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news