पुढारी ऑनलाईन डेस्क :
सोशल मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी नुकतीच ४४ अब्ज अमेरिकन डॉलर्सला विकत घेतली. ( Twitter and Musk ) त्यांनी ट्विटर इंकमध्ये ५४.२० डॉलर रोखीमध्ये प्रति शेअर विकत घेतले आहेत. आता त्यांची नजर ट्विटरच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळविण्यावर आहे. यासंदर्भात एक ट्विट करुन आता ट्विटर वापरताना कोणत्या युजर्सना पैसे मोजावे लागतील हे स्पष्ट केले आहे.
एलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे की, ट्विटरचे व्यावसायिक आणि सरकारी युजर्सना आता अल्प स्वरुपात शुल्क भरावे लागण्याची शक्यता आहे. तसेच सर्वसामन्य युजर्सना पूर्वीसारखीच ही सेवा मोफत असणार आहे.
सध्या ट्विटरची ब्लू सेवा ही सशुल्कच आहे. अल्प मासिक शुल्कावर आधारित असणारी ही सुविधा विशेष फीचर व ॅपचीसदस्यत घेणार्यांना दिली जाते. सध्या ही सुविधा अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये उपलब्ध आहे. जगमरात ट्विटरचे व्यावसायिक आणि सरकारी युजर्सना मोठ्या संख्येने आहेत. आता त्यांनाही ही सेवा घेताना शुल्क द्यावे लागणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ट्विटरमध्ये मोठे बदल करण्याचे संकेत मस्क यांनी दिले आहेत. त्यांची वाटचाल या दृष्टीने सुरु आहे, ट्विटरचे व्यावसायिक आणि सरकारी युजर्सना आता अल्प स्वरुपात शुल्क भरावे लागण्याची शक्यता ही याची सुरुवात आहे. मुक्त अभिव्यक्ती ही लोकशाही राष्ट्रांसाठी आवश्यक आहे. ट्विटर हे मानवतेच्या भविष्यावर चर्चा करणारे मोठे व्यासपीठ आहे, असे मस्क यांनी ट्विटरच्या खरेदीनंतर म्हटलं होते.
हेही वाचा :