पुढारी ऑनलाइन डेस्क : तुर्कस्तान आणि सीरियाला हादरवलेल्या सहा फेब्रुवारीच्या विनाशकारी भूकंपाने (Turkey-Syria earthquake) अख्या जगाला हादरवून टाकले. या भूकंपात ५५,००० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. अजूनही भूकंपाचे धक्के तुर्कस्तान आणि सीरियात बसत आहेत. हे असतानाच आता भूकंपग्रस्त भागात पुराने थैमान घातले आहे. या पूरात आतापर्यंत १४ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर बातमी. (Turkey flood)