Turkey Election 2023 : तुर्कीमध्ये एर्दोगन यांचे वर्चस्व, सलग 11 व्यांदा होणार राष्ट्राध्यक्ष; फेर निवडणुकीत मारली बाजी

Turkey Election 2023 : तुर्कीमध्ये एर्दोगन यांचे वर्चस्व, सलग 11 व्यांदा होणार राष्ट्राध्यक्ष; फेर निवडणुकीत मारली बाजी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Turkey Election 2023 : तुर्कीमध्ये पुन्हा एकदा रेसेप तय्यीप एर्दोगन (Recep Tayyip Erdogan) यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकून आपले वर्चस्व राखले आहे. विरोधी पक्षनेते कमाल कलचदारलू यांचा पराभव करुन एर्दोगन यांनी 11 व्यांदा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.

यापूर्वी, 14 मे रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडला होता, ज्यामध्ये कोणत्याही उमेदवाराला 50% पेक्षा जास्त मते मिळाली नव्हती, त्यामुळे 28 मे रोजी रनऑफ फेरी करण्यात आली. त्यातही एर्दोगन यांनी बाजी मारली. एर्दोगन यांना एकूण 97 टक्के मतांपैकी 52.1 टक्के तर केमाल यांना 47.9 टक्के मते मिळाली आहेत. याचबरोबर मतमोजणीच्या दुसऱ्या टप्प्यात एर्दोगन यांना बहुमत मिळाले. तर कमाल कलचदारलू यांचा पराभव झाला. (Turkey Election 2023)

एर्दोगन 20 वर्षांपासून राष्ट्राध्यक्ष

एर्दोगन 2003 पासून तुर्कीचे नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी तुर्कीला इस्लामच्या धोरणांचे पालन करणारा एक पुराणमतवादी देश बनवण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकीदरम्यान ते पाश्चात्य देश सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचा आरोपही करत आहेत.

कलाचदारलू कोण आहे?

कलचदारलू हे तुर्कीच्या सहा विरोधी पक्षांनी बनलेल्या रिपब्लिकन पीपल्स पार्टी नेशन अलायन्सचे उमेदवार होते. गांधीवादी कलचदारलू, ज्यांना तुर्कस्तानमध्ये 'कमल गांधी' म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी जनतेला देशात लोकशाही परत आण्याचे वचन दिले होते. आपण नाटो सहयोगी देशांसोबतचे संबंध पुनरुज्जीवित करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. ७४ वर्षीय कलाचदारलू याआधी अनेक निवडणुकांमध्ये पराभूत झाले आहेत.

एर्दोगन यांनी गेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर एक महिन्यानंतर जुलै 2018 मध्ये, तुर्कीमध्ये संसदीय पद्धतीऐवजी अध्यक्षीय प्रणाली लागू केली. 2017 मध्ये सार्वमताच्या माध्यमातून राष्ट्रपतींच्या अधिकारात प्रचंड वाढ करण्यात आली होती. याद्वारे एर्दोगन यांनी पंतप्रधानपद रद्द केले आणि पंतप्रधानांचे कार्यकारी अधिकार आपल्या हातात घेतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news