Tirupati Laddu : तिरुपती लाडूसाठी केएमएफचे तूप नाही

Tirupati Laddu : तिरुपती लाडूसाठी केएमएफचे तूप नाही
Published on
Updated on

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  तिरुपती तिरुमला देवस्थान ट्रस्टला (टीटीडी) लाडू बनविण्यासाठी कर्नाटक मिल्क फेडरेशनचे (केएमएफ) तूप मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा विषय चर्चेत आला आहे. गुणवत्तेमुळे केएमएफ टीटीडीला कमी किमतीत तूप विकू शकत नाही, असे केएमएफ अध्यक्ष भीमा नाईक यांनी स्पष्ट केल्याने भाजपने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यात राजकीय हस्तक्षेपाचा आरोपही होत आहे. ( Tirupati Laddu)

दर सहा महिन्यांनी तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) लाडू प्रसाद तयार करण्यासाठी किमान 1,400 टन तूप ई-निविदेद्वारे खरेदी करते. अंदाजे 120 दशलक्ष लाडू बनवून विकताना टीटीडीला वार्षिक 200 कोटी रुपयांहून अधिक नुकसान होते. लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या घटकांच्या किमतीत झालेली वाढ हे तोट्यामागील प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. तर अंदाधुंद सबसिडी आणि विक्रीच्या किमतीतील असमानता हेदेखील कारणीभूत आहेत.

आता केएमएफ नंदिनी ब्रँडचे तूप लाडू बनवण्यासाठी मिळणार नसल्यामुळे केएमएफचे अध्यक्ष नाईक यांनी खंत व्यक्त केली आहे. गुणवत्तेमुळे केएमएफ टीटीडीला कमी किमतीत तूप विकू शकत नाही. आम्ही 1 ऑगस्टपासून दुधाच्या किमतीत होणार्‍या वाढीमुळे जास्त दराचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, टीटीडीने सर्वात कमी बोली लावणारी वेगळी कंपनी (अमूल ब्रँड) निवडली. नंदिनी बाजारात सर्वोत्कृष्ट तूप पुरवते. जर कोणताही ब्रँड नंदिनीपेक्षा कमी किमतीत तूप पुरवत असेल तर तिथे गुणवत्तेशी तडजोड होत आहे, असा दावा नाईक यांनी 31 रोजी बळ्ळारीमध्ये केला. ( Tirupati Laddu)

केएमएफ अधिकार्‍यांनी केलेली विधाने दिशाभूल करणारी आहेत, असे टीटीडीचे कार्यकारी अधिकारी ए. व्ही. धर्मा रेड्डी यांनी सांगितले. केएमएफ मार्च 2023 मध्ये निविदा प्रक्रियेत सहभागी झाली नाही. केएमएफने गेल्या दोन दशकांत फक्त एकदाच मंदिराला तूप पुरवले आहे. केएमएफने ऑक्टोबर 2014 मध्ये पहिल्यांदा निविदा मिळवल्या होत्या. तेव्हा ते सर्वात कमी बोली लावणारे होते, असे रेड्डी यांनी सांगितले. ( Tirupati Laddu)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news