बुलढाणा : देवदर्शनाहून परतणाऱ्या गाडीचा अपघात; चालकासह ३ महिलांचा मृत्‍यू

चालकासह ३ महिलांचा मृत्‍यू
चालकासह ३ महिलांचा मृत्‍यू
Published on
Updated on

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा शेगाव शहरातील प्रवेश कमानीच्या सिमेंटच्या खांबाला भरधाव क्रूजर गाडी धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला. यात चालक व तीन महिला ठार झाल्या आहेत. तर अन्य १४ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शेगाव अकोला येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिर्डी व पंढरपूर येथून दर्शन घेऊन भाविकांची क्रूजर गाडी क्र.एम एच ३७ सी ६१०४ ही आज (सोमवारी) पहाटे गावाकडे परतत होती. यावेळी सकाळी सहा वाजता हा अपघात झाला. हे सर्व प्रवाशी शेगाव परिसरातील ग्रामीण भागातील रहिवासी आहेत. या अपघातात चालक परशुराम गजानन लांजूळकर (३०, रा. अळसणा ता. शेगाव), सुनंदा गजानन झाटे (४०,रा.तरोडा ता.शेगाव), शुभांगी सागर झाटे (३०,रा.तरोडा‌ ता.शेगाव) व शितल अक्षय भारंबे रा.मच्छिंद्रखेड ता. शेगाव हे चारजण ठार झाले.

अळसणा येथून २० मे रोजी ही क्रूजर गाडी शिर्डी व पंढरपूर येथे दर्शनासाठी गेली होती. लांबचा प्रवास पूर्ण होऊन गाडी गावाजवळ आली असता भरधाव गाडीचा अपघात झाला. यामुळे शेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news