…अन क्षणात चिमुकल्यासमोर आईचा डंपरखाली येऊन दुर्दैवी मृत्यू

ऊस-तोड मजुरांच्या ट्रॅक्‍टरला धडकेत ४ जण ठार
ऊस-तोड मजुरांच्या ट्रॅक्‍टरला धडकेत ४ जण ठार
Published on
Updated on

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : आईच्या पाठीमागे गाडीवर बसून शाळेत निघालेल्या चिमुकल्याची शनिवारची सकाळ दुर्दैवीच होती असेच म्हणावे लागेल. भरधाव डंपरच्या धडकेत चिमुकला स्कुटीवरून दूर फेकला गेला तर आई थेट डंपर खाली आली. आपल्या डोळ्यासमोर आईला चिरडल्याचे पाहिल्यानंतर चिमुकल्याचा आकांत काळीज चिरणारा होता. आळंदीत पद्मावती रस्त्यावर शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास भरधाव डंपरच्या धडकेत डंपरच्या चाकाखाली चिरडले गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.

प्रिती योगेश धुमाळ (वय.३५,रा.पद्मावती रस्ता,आळंदी ) असे महिलेचे नाव आहे.सदर महिला पद्मावती रस्त्यावरून आळंदी रस्त्याकडे चालली होती तर भरधाव डंपर आळंदीकडून पद्मावती मंदिराच्या दिशेने चालला होता. डंपरच्या पुढच्या बाजूची धडक बसल्याने प्रीती या मागच्या चाकाखाली फेकल्या गेल्या. त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने प्रिती यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा दूर फेकला गेल्याने तो वाचला. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news