पानशेतच्या घोल खिंडीत डोंगराचा कडा कोसळला ! थोडक्यात वाचले प्रवाशांचे प्राण

पानशेतच्या घोल खिंडीत डोंगराचा कडा कोसळला ! थोडक्यात वाचले प्रवाशांचे प्राण
Published on
Updated on

खडकवासला : पानशेत धरणखोर्‍यातील घोल रस्त्यावरील दापसरे व घोल खिंडीत डोंगराचा कडा कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. कडा कोसळत असताना तेथून जाणार्‍या एस. टी. बसचालकाच्या प्रसंगावधानतेने बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले. हा प्रकार बुधवारी (दि. 19) रात्री साडेआठच्या सुमारास घडला. या ठिकाणी दरवर्षी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे धोकादायक दरडी संरक्षित करण्याची मागणी पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी केली आहे. दापसरे व घोल हद्दीवरील खिंडीत एसटी बस आली असता मुसळधार पाऊस सुरू झाला.

त्या वेळी अचानक मोठा आवाज झाला. एक दगड वेगाने बससमोरील काचेवर आदळला. त्यामुळे प्रसंगावधानता दाखवत चालक पांडुरंग बाळासाहेब पोमण यांनी बस जागेवरच उभी केली आणि काही क्षणातच समोरच्या डोंगराचा कडा कोसळला. कड्याच्या दगडमातीच्या ढिगार्‍याखाली रस्ता गाडून गेला. त्यामुळे बसला पुढे जाता येईना. वाहक महेंद्र नानासाहेब पासलकर यांनी पोमण यांना साह्य केले. बसमध्ये एकच प्रवासी होता. गुरुवारी सकाळी ही बस तेथून माघारी पानशेतमार्गे पुण्याकडे रवाना झाली.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news