नाशिक पेठ रस्त्यावर भीषण अपघात ; तीन तरुण जागीच ठार

नाशिक पेठ रस्त्यावर भीषण अपघात ; तीन तरुण जागीच ठार
Published on
Updated on

नाशिक पुढारी वृत्तसेवा : नाशिक पेठ महामार्गावर झालेल्या आयशर व पिकअप अपघातात चाचडगाव येथील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नाशिक पेठ महामार्गावर काल रात्री साडे सात वाजेच्या सुमारास पेठवरून नाशिककडे जाणारा आयशर क्रमांक एम एच 15 पी व्ही 8934 व चाचडगावकडून येणारी पिकअप क्र – एम एच 15 ए जी 937 यांच्यात समोरासमोर अपघात होऊन पिकअप मधील संतोष हिरामण लांडे (वय 25) हेमंत रघुनाथ मोरे (वय 26) व कमलेश सुकदेव मोरे (वय 27) रा. चाचडगाव हे तिघे जागीच ठार झाले.

तर लखन भगवान गांगोडे (वय 25) रवींद्र वामन पोटींदे (वय 27) दोघे या अपघातात जखमी झाले. अपघात इतका भयंकर होता की, त्यात पिकअप चक्काचूर झाली. रस्त्यावर रक्ताचे मोठ्याप्रमाणात थारोळे साचले. चापडगाव ग्रामस्थांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जात त्यांनी मदत कार्य केले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कावळे, धनंजय शीलावाटे यांनी घटनास्थळी जात जखमींना अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवले. पुढील तपास दिंडोरी पोलिस करीत आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news