निफाड पूर्व भागाला पावसाचा दणका, हजारो हेक्टर पिकांची नासाडी, घरांची पडझड
गोंदेगाव; पुढारी वृत्तसेवा : गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावाने तुफान बरसलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरते न मुरते तोच काल (दि.०१) शुक्रवारपासून निफाड पूर्व भागाला पावसाने झोडपले आहे. दोन दिवस सलग जोरदार पावसामुळे या भागातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. संततधारेमुळे घरांची पडझड झाली आहे. जनावरांचे हाल होत आहेत.
सोयाबीनचं पीक पाण्यात सडताना बघण्याचं दुर्भाग्य शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे. पिकांतून उत्पन्न निघण्याचं दूर, पण केलेला खर्च देखील भरून निघणार नाही. महागडे कांदा बियाणे घेऊन रोपे तयार केली होती. पण पाणी साचून ती देखील सडून गेली.
मका, सोयाबीन, भुईमूग, कांदा रोपे , भाजीपाला आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अजूनही पंचनामे सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गोंदेगावसह, दहेगाव, भरवस, वाहेगाव, गोळेगाव, डोंगरगाव, नांदगाव, देवगाव, मानोरी, पाचोरा आदी गावांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत.
पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले असून पावसाची उघडीप केव्हा होते, याकडे निफाड पूर्व भागातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
हे ही वाचा :
- जायकवाडी धरणातून गोदावरी नदीमध्ये विसर्ग वाढला (video)
- जेवण न दिल्याने लग्नाचे फोटो केले डिलिट; मित्राला शिकविला धडा
- sonakshi sinha : सोनाक्षी सिन्हा म्हणते, मी २१ वर्षांची असतानाच मला…
- Solapur rain: पावसामुळे जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरवर पिके पाण्यात
- विश्वास नांगरे- पाटील महाविकास आघाडी सरकारचे माफिया : किरीट सोमय्या