सोलापूर : उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे यांच्या गाडीला अपघात

सोलापूर : उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे यांच्या गाडीला अपघात
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील दक्षिण आणि अक्कलकोट विभागाचे उपविभागीय अधिकारी तथा पुरवठा विभागाचे उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे यांच्या गाडीला अपघात झाला. भिगवण (जि. पुणे) येथील कोंदीवडे गावाजवळ बुधवारी सकाळी ८ वाजता हा अपघात झाला. यामध्ये तीन कर्मचारी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. तर या गाडीमध्ये उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे नव्हते. त्यामुळे ते सुखरुप असल्याचे ही समजते.

कार्यालयातील कामकाजानिमित्त काही कर्मचारी मुंबई उच्च न्यायालयात जात होते. त्यामुळे उपविभागीय अधिकार्‍यांची स्विफ्ट गाडी नंबर एम एच 13- बी क्यू 0097 ही कार भिगवण जवळ बिस्ट कंपनी जवळील गेट समोर आली असतानाच पुण्याहून सोलापूरकडे येत असलेल्या माल वाहतूक कंटेनर नंबर एम एच 04- एस के 4405 ने समोरासमोर जोराची धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातामध्ये सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून उमेश वैद्य (वय 48), सहाय्यक निवृत्त तहसीलदार राजकुमार वाघमारे (वय 61 रा. सोलापूर) आणि कार चालक प्रफुल्ल क्षीरसागर (वय 33, रा. सोलापूर) हे तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची चौकशी भिगवण पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news