धक्‍कादायक! : सीतापूर हत्‍याकांडाला नवे वळण; मोठ्या भावानेच आई, भावासह त्‍याची पत्‍नी आणि ३ मुलांना संपवले

सीतापूर हत्‍याकांडाला नवे वळण
सीतापूर हत्‍याकांडाला नवे वळण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : सीतापूर हत्‍याकांडात धक्‍कादायक खुलासा समोर आला आहे. पल्‍हापूर गावात आई, पत्‍नी आणि तीन मुलांची हत्‍या अनुराग सिंहने नव्हे तर त्‍याचा मोठा भाऊ अजित सिंहने केली होती. पोस्‍टमार्टम रिपोर्टमध्ये अनुरागच्या डोक्‍यात दोन गोळ्या लागल्‍याची गोष्‍ट समोर आल्‍यावर पोलिसांनी अजितची कसून चौकशी केली. यामध्ये अजितने कुटुंबातील सर्व सहा लोकांच्या हत्‍येची कबुली दिली. चौकशीत हे निष्‍पंन्न झाले की, संपत्‍तीच्या वादातून मोठा भाऊ अजितने अनुराग, त्‍याची पत्‍नी प्रियंका आणि तीन निरागस मुलांसह स्‍वत: ची आई सावित्रीचीही हत्‍या केली. सुरूवातील पोलिसांनी अजित आणि अन्य कुटुंबातील लोकांच्या सांगण्यावरून सांगितले होते की, कुटुंबातील पाच लोकांची हत्‍या करून पती अनुरागने स्‍वत:चे जीवन संपवले.

  • सीतापूर हत्‍याकांडाला नवे वळण
  • माेठ्या भावाने संपत्‍तीच्या वादातून केली ५ जणांची हत्‍या
  • पोस्‍टमार्टम रिपोर्टमुळे सत्‍य आले बाहेर
  • पाेलिसी खाक्‍या दाखवताच आराेपीने कबुल केला गुन्हा

अनुरागला व्यसणी आणि मानसिक रूग्‍ण असल्‍याचे सांगण्यात आले होते. अजितने हे पोलिसी खाक्‍या दाखवताच हे कबुल केले की, त्‍याने पहिला अनुरागला मारले, यानंतर त्‍याने त्‍याची पत्‍नी प्रियंकाला गोळी मारली. या दरम्‍यान मोठी मुलगी जागी झाल्‍यावर तीच्यावरही गोळी झाडली. यानंतर अनुरागच्या दोन्ही मुलांना छतावरून खाली फेकून दिले.

या आधी पोस्‍टमार्टम रिपोर्ट समोर आल्‍यानंतर रविवारी डीजीपी प्रशांत कुमार यांनी आईजी रेंज तरूण गाबा यांना घटनास्‍थळी पाठवले. तेंव्हा पोलिसांनी सामूहिक हत्‍याकांडाचे प्रकरण मानून त्‍या दृष्‍टीने तपासाला सुरूवात केली.

अनुरागचे काका, मोठा भाऊ अजित, त्याची पत्नी आणि दोन नोकरांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या चौकशी दरम्‍यान काही वेळाने अजित मनातून खचला आणि त्याने सर्व हकीकत सांगितली. एसपी चक्रेश मिश्रा म्हणाले की, पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर या घटणेचा नव्याने तपास सुरू करण्यात आला.

पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, एक गोळी अनुरागच्या उजव्या कानाजवळ मारली गेली होती. जी गळा चिरून दुसऱ्या बाजूने निघून गेली. दुसरी गोळी डाव्या बाजूने झाडण्यात आली जी डोक्यात अडकली. त्यांची आई सावित्री यांच्या डोक्याला पाच ते सहा जखमा झाल्या असून, हातोड्याने वार केल्याचे सांगण्यात येत आहे. दहा वर्षांची मोठी मुलगी आस्वीलाही गोळी मारण्यात आली आहे.

पोस्टमार्टम चार तास चालले

दुपारी 3 वाजता मृतांचे पोस्टमॉर्टम सुरू झाले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत शवविच्छेदन सुरू होते. एकूण चार तास शवविच्छेदन झाले. आधी अद्विकचे शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी 2.30 च्या सुमारास त्यांचे आणि आस्वीचे मृतदेह पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचले.
यानंतर अनुराग, त्याची आई सावित्री आणि शेवटी पत्नी प्रियांका यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. ज्यात अनुरागचे पोस्टमार्टम संध्याकाळी 5 वाजता सुरू झाले आणि ते 5.55 पर्यंत चालले. शवविच्छेदनानंतर मृताचे कपडे सुरक्षित ठेवण्यात आले.

उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली होती. यापूर्वी पोलिसांचा असे वाटले होते की एका व्यक्तीने आपली आई, पत्नी आणि मुलांची निर्घृण हत्या केली. यानंतर आरोपीने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. मात्र पोस्‍टमार्टम रिपोर्ट आणि मोठ्या भावाच्या कबुलीमुळे या घटनेला वेगळे वळण प्राप्त झाले.

पल्हापूर खून प्रकरणात एकीकडे पोलिसांनी अनुरागला मानसिक रूग्‍ण समजून त्याला खुनी ठरवले होते, मात्र शवविच्छेदन अहवालाने या संपूर्ण घटनेला निर्घृण हत्येकडे वळवले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news