कोल्हापूर जिल्हा बँकेत निवेदिता माने, यड्रावकर यांनी शिवसेनेचा अपमान केला : संजय पवार

कोल्हापूर जिल्हा बँकेत निवेदिता माने, यड्रावकर यांनी शिवसेनेचा अपमान केला  : संजय पवार
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा :

कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी शिवसेनेने स्वतंत्र्य पॅनेल उभा करत सत्ताधारी पॅनेलला थेट आव्हान दिले आहे. दरम्यान, शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री निवेदिता माने यांनी शिवसेनेसोबत न जाता सत्ताधारी आणि भाजपच्या नेत्यांसोबत गेल्याची खंत शिवसेनेच्यावतीने आज (दि.२३) पत्रकार परिषद व्‍यक्‍त करण्‍यात आली. माजी खासदार निवेदिता माने यांच्यावर कोल्हापूर शिवसेनेचे नेते संजय पवार यांनी जोरदार टीका केली. (shivsena vs nivedita mane)

संजय पवार यांनी सांगितले की, १९९६ च्या लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माजी खासदार निवदिता माने यांना उमेदवारी देत मुलगीची उपमा दिली. त्यानंतर दुसऱ्यांदा उमेदवारी दिली त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवदिता माने माझ्या बहिणीसमान असल्याचे सांगितले. तसेच २०१९ साली त्यांचेच चिरंजीव धैर्यशिल माने यांनी उमेदावारी देत खासदार केले.

shivsena vs nivedita mane : शिवसेना योग्य वेळी उत्तर देईल

शिवसेनेने माने यांच्यावर जिवापाड प्रेम करूनही त्यांनी शिवसेनेचा अपमान केला. शिवसेनेने स्वतंत्र्य: पॅनेल करून ही दोन्ही काँग्रेस आणि भाजपच्या पॅनेलमध्ये माने कुटुंबीय गेले. शिवसैनिकांना शुल्लक समजू नका, असा इशारा संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

जिल्हा बँकेत शिवसेनेसोबत मोठे राजकारण करण्यात आले. आम्ही तीन जागा मागितल्या होत्या त्यातील ते दोन देण्यास मान्य होते परंतु तिसऱ्या जागेसाठी त्यांनी आम्हाला ताटकळत बसवले. राज्यात आघाडी असुनही शिवसेनेसोबत कोल्हापुरात दुजाभाव करण्यात आला. आम्ही एक जागा मागितली ती दिली नाही पण भाजपच्या नेत्यांना तुम्ही ५ जागा देता. जिल्हातील नेत्यांचा पूर्वनियोजीत डाव असल्याचा आरोप संजय पवार यांनी केला.

यड्रावकरांना किंमत मोजावी लागेल

शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेने मंत्री केले त्यांनी जिल्हा बँकेत शिवसेनेसोबत न जाण्याचा विचार केला. त्यांचा मोबदला त्यांना मोजावा लागेल. शिवसेनेच्याविरोधात गेलेल्यांच्या विरोधात आता कामाला लागलं पाहिजे असे संजय पवार म्हणाले.

शिवसेनेचे उमेदवार आम्ही ठरवणार शिवसेनेचे उमेदवार ठरण्याचा अधिकार त्यांना कोण दिला. ज्या कोल्हापुरातून महाविकास आघाडीची सुरूवात झाली त्या कोल्हापुरातूनच शिवसेना म्हणजे काय ते दाखवून देऊ. शिवसेने आता इथुन पुढे त्यांच्या विरोधात कायम राहणार असल्याचेही संजय पवार म्हणाले.

संजय मंडलिक शिवसेनेसोबत

शिवसेना संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांच्याशी दोन दिवस चर्चा केली त्यातून त्यानी काहीही साध्य केले नाही. उलट दुधवडकर यांना ताटकळत ठेवण्याचे काम यांनी केले. हे सरकार उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पण चैनी या नेत्यांची सुरू आहे.जिल्ह्यात शिवसेनेसोबत केलेला अपमान कदापही सहन केला जाणार नाही. दरम्यान संजय मंडलिक हे शिवसेनेसोबत राहणार आहेत. असेही संजय पवार यांनी सांगितले.

संजय पाटील, संजय जाधव, चंद्रकांत पाटील, सर्जेराव पाटील, संभाजी पाटील, संदीप कारंडे, सुरेश पोवार, जीवन पाटील, इंद्रजित पाटील, सतीश कुरणे, बाजीराव पाटील, राजू यादव, आकाराम पाटील, विनोद खोत, तानाजी आंग्रे, राजेंद्र पाटील, शुभांगी पोवार, स्मिता सावंत, विराज पाटील, मंजित माने, कृष्णात पोवार, प्रशांत पोवार, सरदार पोवार, गीतांजली गायकवाड, प्रीती क्षीरसागर, दीपाली शिंदे, वंदना पाटील, अश्विनी घोटगळकर, यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news