सातारा : आईनेच केला चिमुकल्याचा खून

सातारा : आईनेच केला चिमुकल्याचा खून
Published on
Updated on

लोणंद : पुढारी वृत्तसेवा : तरडगाव (ता. फलटण) येथे जन्मदात्या आईनेच आपल्या पाच महिन्याच्या चिमुकल्याचा ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक, तोंड दाबून खून केला. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. आईला लोणंद पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता तिला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या महिलेने आपल्या बाळाचा खून का केला ? याचा पोलीस तपास करीत आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, पांढरी तरडगाव (ता. फलटण) येथे आरती सोमनाथ गायकवाड ही महिला राहते. या महिलेने लोणंद पोलीस स्टेशनला फोन करुन तिच्या पाच महिन्याच्या बाळाला १२ एप्रिल रोजी दुपारी ठार मारुन पुरले आहे. तुम्ही लगेच गाडी पाठवा. नाहीतर मी आणखी दुसऱ्या कोणाचा तरी खून करीन, असे सांगितले होते.

पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे, पोलीस नाईक वाघमोडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अहिवळे यांनी जाऊन खात्री केली. यावेळी  महिलेने आपला मुलगा कार्तिक सोमनाथ गायकवाड याला ब्लँकेटमध्ये गुंडाळले. उशीने  नाक, तोंड दाबून त्‍याचा खून केला. यानंतर मृतदेह पुरल्‍याचे सांगितले. आज (दि.२४) वाई उपविभागाच्या पोलीस अधीक्षक शितल जानवे-खराडे, लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर घटनास्थळी दाखल झाले.

चिमुकल्याचा मृतदेह पुरला होता त्या ठिकाणी खोदण्यात आले  असता मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे शवविच्छेदन  जागेवरच तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी केले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे यांनी लोणंद पोलिसांत फिर्याद दिली. संशयित महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्‍यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news