samantha : समंथाने घटस्फोट होताच पहिल्या नवऱ्याच्या ‘त्या’ दुश्मनाला गाठले!

samantha : समंथाने घटस्फोट होताच पहिल्या नवऱ्याच्या ‘त्या’ दुश्मनाला गाठले!
Published on
Updated on

साऊथ फिल्म स्टार समंथा रूथ प्रभू (samantha) आणि नागा चैतन्य आता वेगवेगळे झाले आहेत. दोन्ही स्टार्सनी 2 ऑक्टोबर 2021 रोजी घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. हे दोघे आता वेगवेगळ्या मार्गावर गेले आहेत.

त्यांच्या घटस्फोटाच्या वेळी, फिल्म इंडस्ट्रीच्या स्टार्सनी देखील प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यावेळी अभिनेत्री कंगनाने समंथा रूथ प्रभूची (samantha) बाजू घेतली आणि अभिनेत्रीपासून घटस्फोट घेतल्याबद्दल नागा चैतन्यला लक्ष्य केले. तिने नागा चैतन्यवर टीका केली आणि सांगितले की स्त्रियांना नेहमीच घटस्फोटाचे कारण का मानले जाते, पुरुषही यासाठी जबाबदार आहेत. यानंतर कंगना राणावतची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली.

आता अलीकडेच अभिनेत्री कंगना राणावतने तिच्या आगामी 'धाकड' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, साऊथ फिल्म अभिनेत्री समंथा रूथ प्रभूने (samantha) देखील या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. समंथाने सोशल मीडियावर फायर इमोजी देखील पोस्ट केला आहे.

सामंथा रूथ प्रभूच्या या प्रतिक्रियेने तिच्यावर प्रेम करणाऱ्या करोडो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. असे दिसते की अभिनेत्री कंगना राणावतच्या या चित्रपटासाठी खूप उत्साहित आहे. अभिनेत्री कंगनाचा पहिला अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. ज्यात अभिनेत्री अग्नी नावाच्या एजंटची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 18 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

विशेष म्हणजे ही पहिली वेळ नाही जेव्हा दक्षिण चित्रपट अभिनेत्री समंथाने अभिनेत्री कंगना राणावतचे कौतुक केले आहे. याआधीही अभिनेत्री समंथाने सोशल मीडियावर अभिनेत्री कंगना राणावतचे अनेक वेळा कौतुक केले आहे. यासोबतच कंगनानेही अनेकवेळा समंथाला पाठिंबा दिला आहे.

हे ही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news