मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थासमोर चालीसा अट्टाहास धरून जेल मुक्कामी गेलेल्या खासदार नवनीत राणा यांचा चालीसा अट्टाहास कायम आहे. श्रीरामाचे नाव घेणे आणि हनुमान चालीसा वाचणे गुन्हा असेल, तर १४ दिवस काय १४ वर्ष शिक्षा भोगण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. मी अशी कोणती चूक केली ? अशी विचारणा त्यांनी केली.
नवनीत राणा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच चांगल्याच आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी रुग्णालयातून बाहेर पडताच शिवसेना, संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. नवनीत राणा यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचताना असली आणि नकली सिद्ध करण्याची वेळ आल्याचा बोचरा वार केला. बाळासाहेबांची शिवसेना असली होती असे त्या म्हणाल्या.
खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टार्गेट करत हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांनी हिंमत असेल निवडणूक लढवून दाखवावी, असे जाहीर आव्हान दिले. एवढ्यावर नवनीत राणा थांबल्या नाहीत. त्या म्हणाल्या की, त्यांनी महाराष्ट्रातील कोणताही मतदारसंघ निवडावा मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
मी मुंबईची मुलगी असून मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे जाहीर केलं आहे. महाविकास आघाडी सरकारला घाबरत नसल्याचे त्यांनी सांगितले.
नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टिकास्त्र सोडले. त्यांनी संजय राऊतांचा पोपट असा उल्लेख केला. त्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचलं का ?