GT vs RR : संजू, हेटमायरचा विजयी धमाका

GT vs RR : संजू, हेटमायरचा विजयी धमाका
Published on
Updated on

अहमदाबाद; वृत्तसंस्था : कर्णधार संजू सॅमसन (32 चेंडूंत 60) आणि शेमरॉन हेटमायर (26 चेंडूंत 56) यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने गुजरात जायंटस्वर 3 विकेटस्नी विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला त्यांच्याच होमग्राऊंडवर 177 धावांत रोखले. गुजरातकडून शुभमन गिलने 45 तर डेव्हिड मिलरने 46 धावांची खेळी केली, पण खराब सुरुवातीनंतर राजस्थानला संजू आणि हेटमायरने विजयी लक्ष्य गाठून दिले. (GT vs RR)

गुजरातच्या 178 धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अतिशय खराब झाली. 2.5 षटकांत 4 धावा झाल्या असताना त्यांचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल (1) आणि जोस बटलर (0) ही सलामी जोडी तंबूत परतली होती, पण देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी डाव सावरला. ही जोडी राशिद खानने फोडली. त्याने पडिक्कलला (26) बाद केले. पाठोपाठ रियान पराग (5) बाद झाला. संजूला साथ देण्यास हेटमायर आला. दरम्यान, संजू सॅमसनने अर्धशतक पूर्ण केले, पण नंतर तो लगेच बाद झाला. त्याने 32 चेंडूंत 60 धावा केल्या; पण हेटमायर हार मानायला तयार नव्हता. त्याने चौकार आणि षटकारांची बरसात करीत लक्ष्य जवळ आणले. ध्रुव जुरेल (18) आणि आर. अश्विन (10) यांनी त्याला हातभार लावला. शेवटी 4 चेंडू शिल्लक असताना हेटमायरने राजस्थानला रॉयल विजय मिळवून दिला. तो 56 धावांवर नाबाद राहिला. (GT vs RR)

तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने वृद्धिमान साहाला पहिल्याच षटकात बाद केल्यानंतर साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र 20 धावांवर साई सुदर्शन धावबाद झाला अन् गुजरातला पॉवर प्लेमध्ये दुसरा धक्का बसला. या दोन धक्क्यानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या जोडीने तिसर्‍या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी जोडल्यावर यजुवेंद्र चहलने 19 चेंडूंत 28 धावा करणार्‍या हार्दिकची शिकार केली. संदीप शर्माने शुभमन गिलची 34 चेंडूंत केलेली 45 धावांची खेळी संपवली.

गिल बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलर आणि अभिनव मनोहर यांनी गुजरातला 150 च्या पार पोहोचवले. मात्र 13 चेंडूंत 27 धावा करणार्‍या मनोहरला झम्पाने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवाला. संदीप शर्माने मिलरला 46 धावांवर बाद करत त्याचे अर्धशतक होऊ दिले नाही. अखेर राजस्थानने गुजरातला 177 धावांवर रोखण्यात यश मिळवले. संदीप शर्माने 4 षटकांत 25 धावा देत 2 बळी टिपले.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news