पुणे : खंडाळा घाटात विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात; २ ठार तर ११ गंभीर

पुणे : खंडाळा घाटात विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात; २ ठार तर ११ गंभीर
Published on
Updated on

लोणावळा; पुढारी वृत्तसेवा : खंडाळा घाटातील अंडा पॉईट जवळ रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी आराम बस पलटी होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर ११ जण गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय आणखी ३५ जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, चेंबूर येथील मयंक टिटोरियल नावाच्या एका खाजगी क्लासचे विद्यार्थी प्रवासी बसमधून लोणावळ्यातील वेट अँन्ड जॉय येथे आले होते. परतीच्या प्रवासात असताना खंडाळा घाटातील वळणावर हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती समजताच बोरघाट व खंडाळा महामार्ग पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामजिक संस्थेचे कार्यकर्ते व इतर यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. सर्व जखमी मुला मुलींना एम. जी. एम. रुग्णालयासह अन्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news