कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरकरांचा दसरा आणि दिवाळी खरेदीचा उत्साह द्विगुणित करणारा 'पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल 2023' अवघ्या तीनच दिवसांवर आला आहे. हा फेस्टिव्हल होत असलेल्या राजारामपुरी कमला कॉलेजजवळील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृह परिसरात भव्य मंडप उभारणीस सुरुवात झाली आहे. नवरात्रौत्सवाच्या काळात सुरू होणार्या या महोत्सवाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
दसरा, दिवाळी म्हटलं की, खरेदी आलीच. घरात नवीन कपडे, घर सजावटीच्या वस्तू, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्यासाठी आवर्जुन लोक दसरा आणि दिवाळीचा मुहूर्त निवडतात. म्हणूनच ग्राहकांना एकाच ठिकाणी भरपूर पर्याय आणि मनासारख्या खरेदीची संधी 'पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल' उपलब्ध करून देणार आहे. या फेस्टिव्हलमधील विविध स्टॉल व्ही. टी. पाटील सभागृहाचा आतील भाग तसेच मैदानावरील भव्य मंडपामध्ये असणार आहेत. त्यासाठीचा भव्य सेटअप पुढील तीन दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे.
दसरा आणि दिवाळी सणांच्या खरेदीची संधी एकाच छताखाली देणारा हा फेस्टिव्हल दि. 13 ते 17 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. भरपूर डिस्काऊंटसह एकाच ठिकाणी मनसोक्त शॉपिंगची पर्वणी हा महोत्सव उपलब्ध करून देणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, गारमेंट, होम डेकोर, ज्वेलरी, मसाले, बेकरी उत्पादने, आयुर्वेदिक प्रॉडक्ट या फेस्टिव्हलमध्ये उपलब्ध आहेत. सकाळी 10.30 ते रात्री 9 या वेळेत हा फेस्टिव्हल सर्वांसाठी खुला राहणार आहे. रॉनिक स्मार्ट वॉटर हीटर आणि जय किसान शक्ती आटा चक्की हे प्रदर्शनासाठी सहप्रायोजक म्हणून लाभले आहेत.
गृहोपयोगी वस्तूंसाठी भव्य दालन, ऑटोमोबाईलचा स्वतंत्र विभाग, फर्निचर, आटाचक्की, किचन ट्रॉली, सौंदर्य प्रसाधने, टी.व्ही., फ्रीज, अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, चहा व मसाल्यांचे पदार्थ, प्लास्टिकच्या विविध वस्तू, शूज, ज्वेलरी, बेकरी उत्पादने, साड्यांच्या असंख्य व्हरायटी, फॅन्सी ड्रेस, सजावटीच्या वस्तू, हेल्थ केअर, पर्सनल केअर, होम केअर असे शंभरांहून अधिक स्टॉल प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतील. या प्रदर्शनामध्ये अनेक नामवंत कंपन्यांच्या चारचाकी, दुचाकी तसेच इलेक्ट्रिक गाड्यांचा स्वतंत्र विभाग असणार आहे. त्यामुळे गाडी खरेदी करू इच्छिणार्यांना एकाच छताखाली सर्व नामवंत कंपन्यांचे शोरूम उपलब्ध झाल्याने त्यांना पुन्हा कंपनीच्या शोरूमला भेट देण्याची गरज भासणार नाही. एकाच ठिकाणी नवनवीन गाड्यांचे मॉडेल्स पाहून त्याची माहिती घेऊन प्रदर्शनातच गाडी बुक करण्याची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे.