PM Narendra Modi : संघटनेसाठी आदर्श नेता

PM Narendra Modi
PM Narendra Modi
Published on
Updated on

पक्षाला निवडणुका जिंकण्याची सवय लावणार्‍या आणि यशाच्या शिखरावर नेणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'हम तो डिसिप्लिन्ड सोल्जर है, अध्यक्ष हमारे लिये सब कुछ होते है' असे म्हणणे हे पक्ष संघटनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भाजपमध्ये मंत्र आहे – संगठन सर्वोपरी. म्हणजे संघटना सर्वात श्रेष्ठ. त्याचे पालन स्वतः नरेंद्र मोदी करतात, त्यावेळी तो पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आदर्श असतो.

संबंधित बातम्या :

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान घडलेली ही घटना आहे. मे 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात नवी दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद झाली. व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजप राष्ट्रीय संघटन मंत्री रामलाल असे पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. मोदीजी पत्रकार परिषदेत स्वतः असल्याने एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला. माझा प्रश्न पंतप्रधानांना आहे, असे सांगितले. तथापि, पत्रकार परिषद ही राष्ट्रीय अध्यक्षांची होती. आपल्याला प्रश्न विचारल्यावर मोदी यांनी स्वतः उत्तर देण्याऐवजी अध्यक्षांकडे हात करून तेच बोलू शकतील असे सूचित केले. त्यावेळी ते म्हणाले, 'हम तो डिसिप्लिन्ड सोल्जर है, अध्यक्ष हमारे लिये सब कुछ होते है.'

पत्रकारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा हा प्रतिसाद आश्चर्यकारक होता. भाजपने संपूर्ण निवडणूक मोदीजींच्या नेतृत्वाखाली लढवली. त्यांच्या सरकारने पाच वर्षांत केलेले काम लोकांना सांगितले व त्याच्या आधारावर मते मागितली. सर्वत्र मोदीजींचा फोटो व नाव वापरून कार्यकर्त्यांनी मतदारांना आवाहन केले. असे असूनही त्याच निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत स्वतः बोलायचे टाळून अध्यक्षच उत्तर देऊ शकतात, असे सांगितले, हा अनुभव नवीन होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाजपला यशाच्या शिखरावर नेले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 2014 ची लोकसभा निवडणूक जिंकली. देशात इतिहास घडला. त्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत एखाद्या पक्षाला शेवटचे पूर्ण बहुमत 1984 साली मिळाले होते. त्यानंतर मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा इतिहास घडला. 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या कालावधीत त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप आघाडीच्या केंद्र सरकारने काम केल्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा स्वबळावर बहुमत मिळाले. लोकसभेत स्पष्ट बहुमतासाठी 272 जागा जिंकणे गरजेचे असताना भाजपला 2014 साली 282 तर 2019 साली 303 जागा मिळाल्या.

पाच वर्षांच्या कारभारानंतर एखाद्या सरकारबद्दल जनतेत नाराजी निर्माण होते व त्यामुळे ते सरकार चालविणार्‍या पक्षाला पुढच्या निवडणुकीत नुकसान सहन करावे लागते, असा सार्वत्रिक अनुभव आहे. त्याला 'अँटी इन्कम्बन्सी' म्हणतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली लढणार्‍या भाजपच्या बाबतीत उलटे झाले. पक्षाचे 'अँटी इन्कम्बन्सी'मुळे नुकसान होण्याऐवजी प्रत्यक्षात भाजपच्या जागा व मते घसघशीत वाढली. मोदी यांच्या अफाट लोकप्रियतेमुळे आणि त्यांच्या सरकारचे काम जनतेला पसंत पडल्यामुळे असा निवडणूक निकाल लागला. विशेष म्हणजे 2014 नंतर भाजपने लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्रासह अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय मिळविला. अनेक राज्यांमध्ये सरकारे स्थापन करून चालविली. पक्षाला निवडणुका जिंकण्याची सवय लावणार्‍या आणि यशाच्या शिखरावर नेणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हम तो डिसिप्लिन्ड सोल्जर है, अध्यक्ष हमारे लिये सब कुछ होते है' असे म्हणणे हे पक्षसंघटनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भाजपमध्ये मंत्र आहे – संगठन सर्वोपरी, म्हणजे संघटना सर्वात श्रेष्ठ. त्याचे पालन स्वतः नरेंद्र मोदी करतात, त्यावेळी तो पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आदर्श असतो. सामान्यतः एखादा पक्ष सत्तेवर आला की, सर्व लक्ष सरकारवर केंद्रित होते आणि संघटना दुर्लक्षित राहते. अशी अनेक उदाहरणे आपल्याला भोवताली दिसतील. पण भाजपच्या बाबतीत तसे झाले नाही.

निवडणुकीच्या रिंगणात भाजपने सातत्याने यश मिळवून सरकारे चालविली व त्याच वेळी पक्षाचे संघटनही सातत्याने अधिकाधिक ताकदवान होत गेले, याचे सर्वात महत्त्वाचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आहेत. ते स्वतः पक्षशिस्त पाळतात आणि त्यांनी आपल्या आचरणाने आदर्श घालून दिल्यामुळे कार्यकर्त्यांनाही प्रेरणा मिळते. एखाद्या पत्रकार परिषदेतच नाही तर पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक उपक्रमामध्ये मोदी संघटनेची शिस्त पाळतात. त्याचा स्वाभाविक परिणाम होतो.

कोरोनाच्या महासाथीत भाजपने रस्त्यावर उतरून सेवाकार्य केले पाहिजे, असा कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाजी यांनी दिला. त्यानुसार आम्ही सर्व परिवर्तनासाठी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात काम केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तर जीवावर उदार होऊन राज्यातील ठिकठिकाणच्या कोव्हिड सेंटर्सना आणि रुग्णालयांना भेट देऊन जनतेला दिलासा देत होते आणि सुविधांचा आढावा घेत होते. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या सेवाकार्याची स्वतः माहिती घेतली. प्रदेशाध्यक्ष या नात्याने महाराष्ट्रातील कामाची मी माहिती दिली. त्यावेळी मोदी यांनी आम्हा कार्यकर्त्यांचे कौतुक केले. चौकशी करताना त्यांनी जे संदर्भ दिले, त्यावरून ध्यानात आले की, संघटना कसे सेवाकार्य करते यावर त्यांचे बारीक लक्ष होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांची यादी पाहिली तर असे ध्यानात येईल की, पक्ष संघटनेत अनेक वर्षे निष्ठेने काम केलेल्यांना सत्तेत स्थान मिळाले आहे. आपल्या संसदीय लोकशाही प्रणालीत राजकीय पक्ष जनतेसमोर जातात, विचार व्यक्त करतात, जाहीरनामा मांडतात, प्रचार करतात आणि मते मागतात. जनता पक्षचिन्हावर मते देते. पुन्हा पुढच्या निवडणुकीतही पक्षच जनतेसमोर जाणार असतो. अशा वेळी सत्ता मिळाल्यानंतर पक्ष संघटनेला महत्त्व देणे व संघटनेच्या विचारसरणीनुसार सरकारच्या माध्यमातून जनतेची सेवा करणे महत्त्वाचे आहे. भाजपमध्ये हे नेमकेपणाने पाळले जाते. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी आपल्या आचरणाने संघटनेसाठी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या सरकारला आठ वर्षे पूर्ण होत असताना त्यांनी सत्तेमध्ये विचारधारेला आणि संघटनेला कसे महत्त्व दिले आहे, याची उजळणी आवश्यक आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news