PBKS vs GT : गुजरातचे पंजाबसमोर 200 धावांचे लक्ष्य

PBKS vs GT : गुजरातचे पंजाबसमोर 200 धावांचे लक्ष्य
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात टायटन्स विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचा कर्णधार धवनने या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. लियाम लिव्हिंगस्टोनच्या जागी सिकंदर रझाला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचवेळी गुजरातचा कर्णधार शुभमन गिलनेही संघात बदल करत मिलरच्या जागी केन विल्यमसनला संधी देण्यात आली आहे. तो आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पहिला सामना खेळणार आहे. (PBKS vs GT)

गुजरातचे पंजाबसमोर 200 धावांचे लक्ष्य

पंजाबविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने विजयासाठी 200 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. गुजरातकडून कर्णधार शुभमन गिलने 48 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 89 धावांची खेळी केली. गिलचे शतक हुकले तरी त्याने आपल्या कामगिरीने संघाला सावरले. गिलच्या या खेळीच्या जोरावर गुजरातने 20 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 199 धावा केल्या. गिल या मोसमात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. पंजाबकडून वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने चार षटकांत 44 धावांत दोन बळी घेतले, तर हरप्रीत ब्रार आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.

विजय शंकर पॅव्हेलियनमध्ये परतला

पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने विजय शंकरला बाद करून पंजाबला चौथा धक्का दिला. विजय 10 चेंडूत आठ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यातील रबाडाची ही दुसरी विकेट आहे. गुजरातचा कर्णधार शुभमन गिल मात्र क्रीजवर आहे. गिलने 42 चेंडूत 80 धावा केल्या आहेत. राहुल तेवतिया त्यांच्यासोबत उपस्थित आहेत.

गिलने झळकावले मोसमातील पहिले अर्धशतक

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने पंजाब किंग्जविरुद्ध शानदार कामगिरी करत आयपीएलच्या मोसमातील पहिले अर्धशतक झळकावले. गिलच्या कारकिर्दीतील हे 19 वे अर्धशतक आहे. पंजाबने गुजरातला तीन धक्के दिले, पण गिल दुसऱ्या टोकाकडून गुजरातचा डाव सांभाळत आहे. गिल 32 चेंडूत 55 धावा करून खेळत आहे, तर विजय शंकर तीन धावा केल्यानंतर त्याच्यासोबत क्रीजवर उपस्थित आहे.

गुजरातला दुसरा धक्का; केन विल्यमसन बाद

हरप्रीत ब्रारने पंजाब किंग्जला दुसरे यश मिळवून दिले. कर्णधार शुभमन गिलसह डाव सांभाळणारा केन विल्यमसन बाद झाला. या मोसमात पहिला सामना खेळणाऱ्या विल्यमसनने 22 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 26 धावा केल्या.

गिल-विल्यमसन जोडीने डाव सावरला

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल आणि केन विल्यमसन जोडीने पंजाब किंग्जविरुद्ध फलंदाज बाद झाल्यानंतर डावाची धुरा सांभाळली. कागिस रबाडाने सलामीवीर रिद्धिमान साहाला बाद करून गुजरातला सुरुवातीचा धक्का दिला, पण पॉवरप्लेच्या शेवटपर्यंत गिल आणि विल्यमसनने दुसरी कोणतीही विकेट पडू दिली नाही. गुजरातने आठ षटकांअखेर एका विकेटवर ६५ धावा केल्या आहेत. गिल 16 चेंडूत 26 धावा केल्यानंतर आणि विल्यमसन 19 चेंडूत 22 धावा केल्यानंतर क्रीजवर आहे.

गुजरातला पहिला धक्का; रिद्धिमान साहा बाद

पंजाब किंग्जविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सला रिद्धिमान साहाच्या रूपाने पहिला धक्का बसला. साहा 13 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. साहाला वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने आपला बळी बनवले. आयपीएलच्या गेल्या पाच डावांमध्ये रबाडाने साहाला आपला बळी बनवण्याची ही चौथी वेळ आहे. सध्या शुबमन गिलसोबत केन विल्यमसन क्रीजवर आहे. (PBKS vs GT)

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news