परभणी : सेलू येथील ‘एमआयडीसी, टेक्स्टाईल पार्क’ला तत्वतः मंजुरी; मेघना बोर्डीकरांच्या पाठपुराव्याला यश

परभणी : सेलू येथील ‘एमआयडीसी, टेक्स्टाईल पार्क’ला तत्वतः मंजुरी; मेघना बोर्डीकरांच्या पाठपुराव्याला यश
Published on
Updated on

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला एमआयडीसी व टेक्सटाईल पार्कचा तिढा अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने सुटला आहे. महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सेलू एमआयडीसीला मूर्त रूप देण्यासाठी मंत्रालयात महत्त्वाची बैठक झाली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार मेघना साकोरे बोर्डीकर, जितेंद्र काकुस्ते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्योग विभाग, संदीप आहेर, उपसचिव राहुल देशपांडे, अभिजीत पारवे, सुनील भोंबे आणि व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल सहभागी झाल्या होत्या.

या बैठकीत आ. बोर्डीकर यांनी शहरातील एमआयडी व टेक्सटाईल पार्कसाठी आग्रही भूमिका घेतली. यावर परिसरातील बाजारपेठेचे ठिकाण व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन ड्रायपोर्ट व लॉजिस्टिक पार्कसाठी मंत्री सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उद्योग विभागास प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या.

आ. बोर्डीकर म्हणाल्या की, सेलू बाजारपेठ ही 'कॉटन हब' म्हणून प्रसिद्ध असून प्रतिवर्षी जवळपास दोन हजार कोटींची उलाढाल होते. इथल्या कापसावर येथेच प्रक्रिया झाल्यास या भागात औद्योगिक क्रांती होइल. या पार्कमुळे परभणी जिल्ह्यातील हजारो युवकांच्या हाताला काम मिळणार आहे. एमआयडीसी व टेक्सटाईल पार्कमुळे तरुणांच्या हाताला काम व शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हाती दाम, असा दुहेरी सुवर्णमध्य साधला जाईल.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news