संगमनेर : पावसाने ओझरचा बंधारा झाला ओव्हरफ्लो

संगमनेर : पावसाने ओझरचा बंधारा झाला ओव्हरफ्लो
Published on
Updated on

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: भंडारदरा आणि निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने या दोन्ही धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे निळवंडे धरणातून सोडलेल्या पाण्यासह पाणलोट क्षेत्रात येणार्‍या छोट्या नद्या, नाल्यांच्या माध्यमातून जमा होणार्‍या पाण्यामुळे संगमनेर तालुक्यातील ओझर बंधारा ओव्हरफ्लो होवून प्रवरा नदीला दुथडी भरुन वाहत असल्याने पर्यटक गर्दी करु लागला आहे. नदी दुथडी भरून वाहू लागल्याने ओझर बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. 21 हजार 151 क्यूसेकने ओझर बंधार्‍याच्या पूर्वेकडील प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भंडारदरा धरणातून शनिवारी सकाळी ओव्हर फ्लोचे पाणी प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. हे पाणी पुढे निळवंडे धरणात येते. निळवंडे धरणातून प्रवरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ओझर बंधार्‍याच्या भिंतीवरून शनिवारी सकाळी 21,151 क्युसेकने पाणी ओझर बंधार्‍याच्या भिंतीवरून प्रवरा नदी पात्रात झेपावताना दिसत आहे.

ओझर बंधार्‍याच्या भिंती नजीक असणार्‍या डाव्या व उजव्या गाळमोरीद्वारे थोड्या फार प्रमाणात पाणी सोडले आहे. सध्या ओझर बंधार्‍याच्या भिंतीवरून प्रवरा नदी पात्रात सुरू अल्याचे चित्र दिसत असून पाणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच डाव्या कालव्यात बंधार्‍याजवळ मोठे भगदाड पडल्याच दिसून येत आहे.

रहिमपूर परिसरातील शेतात पाणी शिरण्यास सुरुवात झाल्याने शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओझर बंधारा ओव्हरफ्लो झाल्याने बंधार्‍याच्या पूर्वेकडील प्रवरा नदी काठावरील गावातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. ओझर बंधार्‍याच्या या पूरस्थितीवर कर्मचार्‍यांचे लक्ष आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news