पुन्हा एकदा नाशिक महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकेल : देवेंद्र फडणवीस

पुन्हा एकदा नाशिक महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकेल : देवेंद्र फडणवीस
Published on
Updated on

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क :   छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी भाजपवर असून नाशिक महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकेल असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.  देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक दौ-यावर आहेत. यावेळी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी व्यासपिठावर केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, प्रभारी जयकुमार रावल, देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल आहेर, बाळासाहेब सानप, राहुल आहेर, राहुल ढिकले, गिरीश पालवे, नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना एकत्र येत एकसंघ पद्धतीने लढाई लढण्याचे आवाहन केले. फडणवीस म्हणाले, नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस हे तिघेही आपल्या विरोधात लढणार आहेेत. कोण्या एकाची आपल्या सोबत लढण्याची क्षमता नाही, ते तीघे पक्ष एकत्र असल्याने आपल्यालाही एकत्र येऊन एकसंघ पद्धतीने लढाई लढावी लागणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेवर अप्रत्यक्षरित्या जोरदार टीका केली. ते म्हणाले, जनतेचा आशिर्वाद भाजपलाच आहे. आम्हाला दलाली खायला राज्य नकोय, तर परिवर्तनासाठी हवं आहे. महाराष्ट्रात सरकारचे अस्तित्वच नाही. मुंबईच्या पलिकेडे महाराष्ट्र आहे की नाही याची कल्पना सरकारला नाही. रोज काय होतेय हे अवघ्या महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी पाहते आहे. काहीजण भगवा फक्त मिरवण्याचे काम करतात, असा टोला त्यांनी नाव न घेता शिवसेनेला लगावला.

कोविड काळात राज्यसरकारने नाशिकवर अन्याय केला. इतर ठिकाणी सरकारने कोविड सेंटर काढले. नाशिकला मात्र साधा ऑक्सीजन पुरवठाही राज्यसरकारने पुरवला नाही. याउलट भाजपने या काळात मोठा संघर्ष केला. मंत्रालयात आंदोलने केली तेव्हा कुठे राज्यसरकारला जाग आली व नाशिकला ऑक्सीजन पुरवठा केला गेला असे फडणवीस म्हणाले. नाशिकमध्ये आयटी पार्कच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करणार असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news