पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या मानहानीच्या तक्रारीच्या सुनावणीत उपस्थित न राहिल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणी शिवडी न्यायालयाने राऊत यांच्याविरोधात आज (दि. ६) अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
शिवडी महानगर दंडाधिकाऱ्यांनी वॉरंट जारी केले असून त्यांनी तक्रारदाराचे म्हणणे नोंदवले आहे. या प्रकरणाची सुनावणी २४ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही राऊत (Sanjay Raut) हजर राहिले नाहीत, असे मेधा सोमय्या यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले.
मुंबईजवळील मीरा भाईंदर परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या बांधकाम आणि देखभालीशी संबंधित १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात राऊत यांनी बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप केल्याचा दावा सोमय्या यांनी न्यायालयात केला आहे. तसेच राऊत यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४९९ (गुन्हेगारी मानहानी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचलंत का ?