प्रत्यक्ष कर वसुलीमध्ये २४ टक्क्यांची वाढ

प्रत्यक्ष कर वसुलीमध्ये २४ टक्क्यांची वाढ
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा: एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत प्रत्यक्ष कर (  Direct Tax )  वसुलीत 24 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाकडून सोमवारी देण्यात आली. चालू आर्थिक वर्षातील एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत पहिल्या आठ महिन्यात झालेली करवसुली 61.79 टक्के इतकी आहे. चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने 14.20 कोटी लाख रुपये इतके प्रत्यक्ष करवसुलीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत झालेली प्रत्यक्ष करवसुली 8.77 लाख कोटी रुपये इतकी आहे. गत आर्थिक वर्षातील पहिल्या आठ महिन्यांत झालेल्या करवसुलीत तुलनेत ही वसुली 24.26 टक्क्यांनी जास्त आहे. मागील काही काळात जीएसटी करवसुलीचा मासिक आकडा 1.40 ते 1.50 लाख कोटी रुपयांच्या आसपास स्थिर झालेला आहे. 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर या कालावधीत 2.15 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला असून गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत तो 67 टक्क्यांनी जास्त असल्याचे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news