National Herald Case : चौकशीसाठी सोनिया गांधी ईडी कार्यालयात दाखल; देशभरात काँग्रेस आक्रमक

National Herald Case : चौकशीसाठी सोनिया गांधी ईडी कार्यालयात दाखल; देशभरात काँग्रेस आक्रमक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या चौकशीसाठी आज गुरुवारी ईडी (अंमलबजावणी संचालनालय) कार्यालयात दाखल झाल्या आहेत. ईडीने त्यांना समन्स बजावून (ED Summons) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्या आज (दि.21 जुलै) ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. (ED Summons) डॉक्‍टरांनी त्‍यांना विश्रांती घेण्‍याचा सल्‍ला दिला होता. त्‍यामुळे त्‍या ईडी चौकशीला सामोरे गेल्‍या नव्हत्या. जुलै महिन्‍याच्‍या अखेरीस चौकशीसाठी हजर राहावे, असे ईडीने त्‍यावेळी म्‍हटलं होतं. त्‍यानुसार आता त्‍यांची नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिग प्रकरणी २१ जुलै रोजी चौकशी होणार आहे. या पूर्वी नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही ईडीने सलग पाच दिवस चौकशी केली होती. दरम्यान, सोनिया गांधी यांच्या ईडी कारवाई विरोधात संपूर्ण राज्यात काँग्रेसकडून आंदोलन आणि निदर्शने सुरू आहेत. तर सोनिया गांधी यांच्याकडे ईडी काय चौकशी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ईडी तीन टप्प्यांमध्ये सोनिया गांधी यांची चौकशी करणार असून यामध्ये 7 वैयक्तिक प्रश्न विचारले जाणार असल्याचे समजचे. सोनिया गांधींची चौकशी करण्यासाठी ईडीने विशेष तयारी केली आहे. ईडीचे अतिरिक्त महानिदेशक मोनिका शर्माच्या नेतृत्वात तीन टप्प्यांमध्ये सोनिया गांधींची चौकशी केली होती. कागदपत्र दाखवून देखील चौकशी केली जाईल. ईडीच्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांना चौकशी दरम्यान आराम दिला जाईल. यासंदर्भात तशी मागणी करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात सात वैयक्तिक प्रश्न विचारले जातील आणि त्यानंतर यंग इंडिया बाबत चौकशी केली जाईल. दुस-या टप्प्यात एजेएल आणि काँग्रसबाबत प्रश्न विचारले जातील. तर तिस-या टप्प्यात सर्व पैलूंवर चौकशी केली जाईल.

काय आहे नॅशनल हेरॉल्ड प्रकरण आणि त्याचा तपशील?

नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्र नुकसानीत चालत आहे. या वृत्तपत्राच्या आर्थिक बाबींमध्ये हेराफेरी करून याला हडपण्याचा आरोप करण्यात आला आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी आतापर्यंत झालेल्या घडामोडी

1 नोव्हेंबर 2012
भाजप नेता सुब्रमण्यम स्वामींनी दावा दाखल केला

26 जून 2014
कोर्टाने सोनिया गांधी, राहुल गांधी सोबत अन्य सर्व आरोपींना समन्स बजावले

1 ऑगस्ट 2014
ईडीने केस दाखल केला

19 डिसेंबर 2015
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने सर्व आरोपींना जामीन दिला

2016
सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसी नेत्यांच्या विरोधात कारवाई रद्द करण्याचा नकार दिला

सप्टेंबर 2018
दिल्ली उच्च न्यायालयात सोनिया आणि राहुलची आयकर विभागाची नोटीस विरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली

2 जून 2022
ईडी ने सोनिया आणि राहुल यांच्या चौकशीसाठी समन्स जारी केले
राहुल गांधी यांची जवळपास 50 तसा चौकशी झाली आहे. तर आज सोनिया गांधी यांची चौकशी होणार.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news