Nashik News : निफाडला नकली दूधविक्रीचा पर्दाफाश, शेतकऱ्याला गोठ्यातच अटक

Nashik News : निफाडला नकली दूधविक्रीचा पर्दाफाश, शेतकऱ्याला गोठ्यातच अटक
Published on
Updated on

निफाड : पुढारी वृत्तसेवा, निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे बनावट दूध तयार करून दुधात भेसळ करणाऱ्या व त्याची विक्री करणाऱ्या तरुण शेतकऱ्याला पोलिसांनी गोठ्यातच बेड्या ठोकल्या. नकली दूधविक्री धंद्याचा पर्दाफाश करताना पोलिसांनी घटनास्थ‌ळी 14 ड्रममधील दूधसदृश रसायन, तेलसदृश द्रवाचा साठा जप्त केला. (Nashik News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दि. 10 ऑक्टोबरला पहाटेच्या सुमारास निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे अतुल वसंतराव कातकडे हा मळ्यातील वस्तीवर दुधामध्ये भेसळ करून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस उपअधीक्षक विशाल क्षीरसागर, निफाडचे सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर पाटील यांच्या विशेष पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी छापा मारला असता संशयित अतुल कातकडे दुधात भेसळ करतानाच सापडला. तपासादरम्यान घटनास्थळी दूध पावडरची वापरलेली व विना वापरलेली बॅग मिल्की मिस्ट या कंपनीची पावडर, तसेच २०० लिटरच्या बॅरलमध्ये ठेवलेले तेलसदृश द्रवाचा साठा आढळला. या ठिकाणी प्रत्येकी 40 लिटर क्षमतेच्या 14 ड्रममध्ये दूधसदृश रसायन आढळले. हे रसायन स्वतःच्या गोठ्यातील गायीच्या दुधामध्ये मिसळून भेसळयुक्त दुधाची विक्री करत असल्याचे उघड झाले. भेसळीसाठीचे रसायन सिन्नर तालुक्यातून आणल्याचेही तपासात दिसून आले. पोलिसांनी भेसळयुक्त दुधाचे व अन्य रसायनांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. नाशवंत घातक मुद्देमालाची जागीच विल्हेवाट लावण्यात आली आहे.

नकली दूध आणि त्यासाठी वापरली जाणारी रसायने ही मानवी आरोग्यासाठी घातक अपायकारक असल्याची माहीत असूनही भेसळयुक्त दुधाची निर्मिती व विक्रीबद्दल नाशिकचे अन्नसुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी यांनी निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news