नाशिक : सततच्या त्रासाला कंटाळलेल्या बहिणीकडून लहान भावाचा निर्घृण खून

नाशिक : सततच्या त्रासाला कंटाळलेल्या बहिणीकडून लहान भावाचा निर्घृण खून
Published on
Updated on

मनमाड : पुढारी वृत्तसेवा : भाऊ नेहमी शिवीगाळ, मारहाण करून त्रास देत आहे. त्याच्या या सततच्या त्रासाला कंटाळून बहिणीने लहान भावाच्या पोटावर चाकूने वार करुन त्याचा निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना आज (दि.२६) दुपारी शहरातील विवेकानंदनगरमध्ये घडली. संदीप गोंगे (वय ४५) असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. दरम्यान, खून केल्यानंतर आरोपी बहिण शोभा गारुडकर (वय ५५) हिने पोलीस ठाण्यात जाऊन भावाच्या खूनाची कबुली दिली. भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विवेकानंदनगर क्रमांक २ मध्ये संदीप गोंगे हा आई आणि इतर नातेवाईकांसोबत राहत होता. आई आजारी असल्यामुळे तिची सेवा करण्यासाठी श्रीरामपूर येथे राहणारी त्याची बहीण शोभा गारुडकर ही काही महिन्यापूर्वी मनमाडला आली होती. संदीप हा व्यसनी होता. तो शोभाला नेहमीच त्रास देत असे. येथे आल्यावर त्याचा त्रास वाढला होता. रोज काहीही कुरापत काढून तो तिला शिवीगाळ करून कधी कधी मारहाण देखील करायचा.

कोरोना काळात शोभाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले असताना संदीपचा त्रास कमी होण्याऐवजी आणखी वाढला होता. आज दुपारी ती जेवण करीत असताना संदीपने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर शोभाने टोकाचे पाऊल उचलत संदीपच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. घाव वर्मी लागल्यामुळे संदीप रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक समीरसिंग साळवे, सहायक निरीक्षक प्रल्हाद गीते, उपनिरीक्षक पी. डी. सरोवर घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी आरोपी शोभा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news