सोलापूर : माथेफिरूने लावली स्वतःच्याच घराला आग, शेजार्‍यांचेही नुकसान

स्वतःच्याच घराला आग, शेजार्‍यांचेही नुकसान
स्वतःच्याच घराला आग, शेजार्‍यांचेही नुकसान
Published on
Updated on

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : अक्‍कलकोट रोडवरील औद्योगिक वसाहतीजवळील नक्‍का वस्तीमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास घरांना आग लागून मोठे नुकसान झाले. यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही. एका माथेफिरू व्यक्‍तीने स्वतःच्याच घराला आग लावली व नंतर शेजार्‍यांच्या घरांपर्यंत गेली असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

नक्‍का वस्तीमधील शाम भंडारी यांच्या घराला सायंकाळच्या सुमारास अचानकपणे आग लागली. भंडारी हे गेल्या काही दिवसापासून घरगुती वादामुळे तणावात असून त्यातूनच त्यांनी हा प्रकार केल्याचे शेजारी राहणार्‍या नागरीकांनी सांगितले. याबाबत माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून ही आटोक्यात आणली.

हेही वाचलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news