Mahindra XUV400 बुकींग सुरु; जाणून घ्या चार्जिंग आणि किंमत

Mahindra XUV400 बुकींग सुरु; जाणून घ्या चार्जिंग आणि किंमत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  सध्या इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आहे. महिंद्रा कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांबद्दल गेले कित्येक दिवस जोरदार चर्चाच ऐकायला मिळत होत्या. कंपनीने XUV400 हे इलेक्ट्रीक मॉडेल लॉन्च करुन कार चाहत्यांना मोठी खुशखबर दिली होती. महिंद्रा कंपनीने आता या कारच्या बुकिंगबाबत आणि अन्य काही महत्त्वाची माहिती दिली आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने त्यांच्या नव्या Mahindra XUV400 इलेक्ट्रिक कारचे बुकिंग सुरु केले आहे. कारचे बुकिंग २१,००० रुपये इतकी रक्कम भरुन टोकन घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. महिंद्रा डीलरशिपद्वारे किंवा कंपनीच्या वेबसाइटद्वारे हे बुकिंगची सुविधा मिळू शकते.

XUV 400 चे दोन व्हेरिअंट

XUV400 EC आणि XUV400 EL या दोन व्हेरिअंटमध्ये ही कार लॉन्च करण्यात येईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. XUV400 EC या मॉडेलमध्ये 3.3kW किंवा 7.2kW आणि XUV400 EL या मॉडेलमध्ये 7.2kW इतकी बॅटरी क्षमता असेल, अशी प्राथमिक माहिती आहे.

महिंद्राच्या या नव्या मॉडेलच्या किंमती

3.3kW चार्जर क्षमतेची 15.99 लाख रुपये (एक्स-शोरूम), तर 7.2kW चार्जर क्षमतेची 16.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) अशी XUV400 EC ची किंमत असेल. 7.2kW चार्जर क्षमता असलेल्या XUV400 EL मॉडेलची किंमत 18.99 लाख (एक्स-शोरूम) इतकी असेल. या किंमती सुरुवातीच्या 5,000 बुकिंगसाठीला लागू असतील अशी. त्यानंतर यामध्‍ये काही बदल होण्याची शक्यता आहे.

XUV400 कारचा चार्जिंग कालावधी

XUV400 EC हे SUV मॉडेल 375 किलोमीटर तर, XUV400 EL हे मॉडेल 456 किलोमीटर इतकी मायलेज रेंज असेल अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. XUV400 ची बॅटरी DC फास्ट चार्जरने 100% पर्यंत चार्ज होण्यासाठी 50 मिनिटांचा कालावधी लागेल, अशी प्राथमिक माहिती आहे. याव्यतिरिक्त, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कोणत्याही 16A प्लग पॉइंटचा वापर करून चार्ज केली जाऊ शकते.

Tata Nexon EV या कारला XUV400 देणार टक्कर

टाटाची Nexon EV कार ही कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV च्या सेगमेंटमध्ये सध्या वर्चस्व गाजवत आहे. या कारला आता महिंद्राचे नवीन मॉडेल प्रतिस्पर्धी असणार आहे. Tata Nexon EV ची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख ते 17.50 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news