ग्वाल्हेर; पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, गांधीजींबद्दल काही लोकांना वाटते की त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले, पण हे सत्य नाही. त्यांची शैक्षणिक पात्रता फक्त हायस्कूल पर्यंतची होती. सिन्हा यांनी यावेळी गांधीजींचे कौतुक सुद्धा केले. ते म्हणाले की त्याच्याकडे एकमेव शस्त्र होते, ते म्हणजे सत्य आणि ज्याची साथ त्यांनी कधीच सोडली नाही. (Jammu Kashmir LG Manoj Sinha)
23 मार्च या शहीद दिनीच डॉ. राम मनोहर लोहिया यांची जयंती येते, या निमित्त आयोजित कार्यक्रमात जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ग्वाल्हेर येथील आयटीएम विद्यापीठात वादग्रस्त वक्तव्य केले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्तुतीसह महात्मा गांधींच्या पदवीवर भाष्य केले. ते म्हणाले की, गांधीजींकडे कोणतीही पदवी नव्हती. (Jammu Kashmir LG Manoj Sinha)
ANI व्हिडिओनुसार, डॉ. राम मनोहर लोहिया मेमोरियल लेक्चरला संबोधित करताना, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले, "गांधीजींनी महान गोष्टी केल्या. त्यांनी स्वातंत्र्य मिळवले. त्यांनी सत्याच्या अधीन राहून काम केले आणि त्याचे आचरण सुद्धा केले. त्यांच्या आयुष्यात जी काही संकटे आले, तेव्हा त्यांनी सत्य कधीच सोडले नाही. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की अनेक सुशिक्षित लोकांना वाटते की गांधीजींकडे कायद्याची पदवी होती. पण तसे नाही, त्यांच्याकडे कोणतीही पदवी नव्हती. पण, आज कोणीही म्हणू शकत नाही की गांधीजी शिकलेले नव्हते. (Jammu Kashmir LG Manoj Sinha)
महात्मा गांधींबद्दल लोकांच्या माहितीनुसार, महात्मा गांधी 1893 मध्ये दक्षिण आफ्रिकेला गेले होते. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि पदवी मिळवून ते वकील झाले. पण, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तथ्यांसह या गोष्टीला नकारतात. मंचावर भाषण करताना ते म्हणाले की, अनेक सुशिक्षित लोकांना वाटते की गांधीजी पदवीधारक होते, परंतु तसे नाही. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, जे मी नंतर तुमच्यासोबत शेअर करेन.
राज्यपाल पुढे म्हणतात, "गांधीजींकडे कायद्याची पदवी होती असा एक गैरसमज आहे. तुम्हाला माहित आहे का की त्यांच्याकडे विद्यापीठाची एकही पदवी नव्हती? त्यांची एकमेव पात्रता ही हायस्कूल डिप्लोमा होती. त्यांनी कायद्याचा अभ्यास करण्याची पात्रता मिळवली पण, त्यांच्याकडे कोणतीही कायद्याची डिग्री नव्हती.
मनोज सिन्हा पुढे म्हणाले की, त्यांच्याकडे पदवी नसली तरी गांधीजी निरक्षर होते असे म्हणण्याचे धाडस कोणी करू शकत नाही. त्यांनी आपल्या कर्तुत्वाने आणि ज्ञानाने देशात सर्वोच्च स्थान प्राप्त केले. म्हणून त्यांना राष्ट्रपिता म्हटले जाते.
अधिक वाचा :