व्हॉटसअप, Zoom कॉलसाठी KYC – विधेयकात तरतुद – KYC norms for messaging apps

WhatsApp Edit Message
WhatsApp Edit Message
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन – व्हॉटसअप आणि इतर मेसेजिंग अॅपवरून फोन कॉल कॉलची सुविधा वापरण्यासाठी KYC (Know Your Customer) सक्तीचे केले जाणार आहे. दूरसंचार विधेयकात ही तरतुद आहे. यामुळे अशा मेजेसिंग अॅपवरून होणारी फसवणूक मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात येऊ शकणार आहे. (KYC norms for making calls on messaging apps)

नव्या दूरसंचार विधेयकाबद्दलची माहिती दूरसंचार मंत्री अश्विनी वैश्णव यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यात त्यांनी KYC बद्दलची माहिती दिली होती. तर टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात Gmail अकाऊंटसाठीही KYC लागू शकेल. तर इंडियन हेराल्ड या वेबसाईटने Zoom च्या वापरासाठीही KYC आवश्यक केले जाणार असल्याचे म्हटले आहे.

युजर्सचे संरक्षण हा या विधेयकाचा गाभा आहे. त्यामुळे मेसेजिंग अॅपवर कॉल करताना KYC सक्तीची केले जाणार आहे, अशी माहिती अश्विन यांनी दिली होती. ज्या ठिकाणी KYC शक्य नाही, अशा स्थितीत काय तांत्रिक मार्ग काढता येईल, याचा निर्णय सरकार संबंधित कंपन्यांशी बोलून घेणार आहे. KYC सक्तीचे केल्यामुळे फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर कमी होतील, असे सरकारला वाटते. KYC असल्याने फसवणूक केलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे सरकारला शक्य होणार आहे.

या विधेयकानंतर सरकार Digital Personal Data Protection bill आणि Digital India bill हे दोन विधेयक सादर करणार आहे. दूरसंचार विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी ६ ते १० महिने इतका कालावधी लागणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news