जालना : मेहुण्याच्या तेरवीच्या कार्यक्रमानंतर घरी परतताना अपघातात एक जण ठार

बस-दुचाकीच्या धडकेत एकजण ठार
बस-दुचाकीच्या धडकेत एकजण ठार
Published on
Updated on

भोकरदन : पुढारी वृत्‍तसेवा मेहुण्याच्या तेरवीचा कार्यक्रम आटपून परत घरी येत असतांना भोकरदन-जाफराबाद रस्त्यावरील आन्वा फाट्याजवळील शरद ट्रॅक्टर शोरुमसमोर बस-दुचाकीची समोरसमोर धडक झाली. यामध्ये एकजण जागीच ठार झाला. या अपघातात दिलीप शेनफड बावस्कर (वय ३२ रा.देहेड ता.भोकरदन जि.जालना) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, देहेड येथील दिलीप शेनफड बावस्कर हे मंगळवारी (दि.२३) रोजी भोकरदन तालुक्यातील विटा (रामनगर) येथे मेव्हण्याचा तेरवीचा कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री विटा येथे मुक्कामी राहले होते. दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि.२४) सकाळीच महत्वाचे काम असल्याने दिलीप बावस्कर हे एकटेच आपल्या गावाकडे देहेड येथे जात होते. यावेळी भोकरदन-जाफराबाद रस्त्यावरील आन्वा फाट्याजवळील शरद ट्रॅक्टर शोरुमसमोर दुचाकी क्र. एमएच.२१ ए.झेड ९३६२ आणि  बस क्र. एम.एच ४० एक्यु ६४४७ मलकापूर-पुणे समोरासमोर धडक झाली.

बसच्या जोराच्या धडकेत युवक दिलीप बावस्कर हा जागीच ठार झाला. यानंतर दुचाकी चालकास भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषीत केले. शवविच्छेदन करून देहेड येथे २ वाजता शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले.  त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, तीन मुली, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

पत्नीला अपघाताची माहिती मिळतात आक्रोश

भोकरदन तालुक्यातील विटा (रामनगर) येथे तेरवीचा कार्यक्रमाच्या दिवशी मुक्कामनंतर दुसऱ्या दिवशी गोड जेवणाचा कार्यक्रम असल्याने पत्नीला तु उद्या आरामशीर घरी ये असे पतीने सांगितले. काही महत्त्वाचे काम असल्याने दिलीप बावस्कर हे आपल्या देहेड गावाकडे निघाले होते. भोकरदन येथे आपल्या पतीचा अपघात झाल्याची माहिती पत्नीला मिळाली. यावेळी पत्नीचा आक्रोश पाहून नातेवाईकांना अश्रूचे बांध फुटले होते. गेल्या १३ दिवसांपूर्वी भावाचे दु:खद निधन त्‍यातच पतीचे अपघाती निधन झाल्याने बावसक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news