Jaipur-Mumbai train firing | रेल्वे गोळीबार घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर

Jaipur-Mumbai train firing | रेल्वे गोळीबार घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये काल झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील (Jaipur-Mumbai train firing) मृतांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांने दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

या दुर्दैवी गोळीबाराच्या घटनेत एक आरपीएफ जवान आणि ३ प्रवाशी मृत्युमुखी पडले. यामध्ये टिकाराम मीना (वय 45 वर्षे) यांच्यासह ब्दुल कादरभाई मोहम्मद हुसेन, अख्तर अब्बास अली आणि मोहम्मद हुसैन यांचा समावेश आहे. तसेच या गोळीबार प्रकरणी (Train firing incident) सर्वसमावेशक चौकशी करण्यासाठी रेल्वे पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे, असेही मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांने एएनआयला दिलेल्या माहितीत सांगितले आहे. (Jaipur-Mumbai train firing)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news