आयपीएल फ्रँचायझीची सहा क्रिकेटपटूंना तब्‍बल ५० कोटींची ऑफर, मात्र ठेवली ‘ही’ अट

आयपीएल फ्रँचायझीची सहा क्रिकेटपटूंना तब्‍बल ५० कोटींची ऑफर, मात्र ठेवली ‘ही’ अट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल ) स्‍पर्धेतील अव्‍वल संघांच्‍या मालकांनी ( फ्रँचायझी ) इंग्‍लंडमधील सहा क्रिकेटपटूंना ५० कोटींची ऑफर दिली आहे. मात्र त्‍यांना एक वर्षासाठी आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटला अलविदा करुन पूर्णवेळ टी-२० क्रिकेटच खेळावे लागेल, अशी अटही घातली आहे, असे वृत्त 'टाइम्स लंडन'ने दिले आहे. (IPL Franchises )

'टाइम्‍स लंडन'ने आपल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, आयपीएलमधील अनेक फ्रँचायझी खेळाडूंशी वर्षभराच्‍या करारासाठी प्रयत्‍न करत आहेत. या करारानुसार खेळाडूंना वर्षभर वेगवेगळ्या टी-२० लीगमध्ये खेळावे लागणार आहे. आयपीएल व्यतिरिक्त, यात वेस्ट इंडिजची सीपीएल, दक्षिण आफ्रिका टी20 लीग, यूएईची ग्लोबल टी20 लीग आणि अमेरिकेत होणारी टी20 लीग या स्‍पर्धांचा समावेश आहे. या सर्व लीगमध्ये १० आयपीएल फ्रँचायझींपैकी अनेक संघ आहेत. दरम्‍यान या वृत्तात कोणत्या खेळाडूंना कोणत्या फ्रेंचायझीने संपर्क साधला आहे हे स्पष्ट केलेले नाही.

देशाकडून खेळण्‍यासाठी घ्‍यावी लागेल IPL Franchises कडून परवानगी

एखाद्या खेळाडूने आयपीएलमध्‍ये वर्षभर खेळण्‍यासाठी करार स्वीकारला तर त्‍याला केवळ संबंधित आयपीएल फ्रँचायझीकडूनच खेळावे लागले. तसेच या खेळाडूला त्याच्या देशाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी फ्रेंचायझीकडून परवानगी घ्यावी लागेल. सध्‍या फुटबॉलमधील लीगमध्‍ये अशा प्रकारे खेळाडू करार करतात आता क्रिकेटमध्‍येही हेच घडण्‍याची शक्‍यता आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक देशाचे खेळाडू त्यांच्या देशाच्या क्रिकेट बोर्डानुसार खेळतात आणि T20 लीगमध्ये सहभागी होण्यासाठी बोर्डाची परवानगी घेतात.

 'आयसीसी' करतीय नव्‍या नियमाचा विचार

टी-20क्रिकेटची लोकप्रियता खूप जास्त आहे आणि टी-10 मधील प्रेक्षकांची आवडही वाढत आहे. एका वर्षात एक खेळाडू किती टी-२० लीगमध्ये भाग घेऊ शकतो याचा नियम आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी ) तयार करण्याचा विचार करत आहे; परंतु सध्या असा कोणताही नियम नाही. तथापि, अनेक युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अकाली निवृत्ती घेऊन पैसे कमावण्यासाठी टी-२० लीग खेळण्याची शक्यता आहे. सध्या न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट आणि गप्टिल सारख्या खेळाडूंनी त्यांच्या क्रिकेट बोर्डाचे केंद्रीय करार T20 लीगमध्ये खेळण्यासाठी सोडले आहेत, असेही या वृत्तात स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

IPL Franchises : इंग्‍लंड क्रिकेट बोर्डाच्‍या करारापेक्षा पाचपट अधिक मानधन

वर्षभरासाठी करार करण्‍यासाठी सर्वप्रथम ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी संपर्क साधण्यात आला. आता इंग्लंडमधील खेळाडूंची चर्चा झाली आहे. एका वर्षाच्या करारासाठी खेळाडूंना 20-50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे, जी इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून केंद्रीय करार मिळवणाऱ्या अव्वल खेळाडूंपेक्षा पाचपट जास्त आहे, असेही या वृत्तात म्‍हटले आहे.

इंग्लंड संघातील कसोटी खेळाडू सध्या कोणत्याही आयपीएल फ्रँचायझीकडून ऑफर स्वीकारण्याच्‍या तयारीत नाहीत; परंतु या खेळाडूंना मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंनी ऑफर स्वीकारण्याची शक्यता नेहमीच असते. याशिवाय, खेळाडू त्यांच्या देशाच्या क्रिकेट बोर्ड आणि आयपीएल फ्रँचायझीशी आंशिक करार करू शकतात. या स्थितीत खेळाडू टी-20 लीगसाठी ठराविक वेळेत आणि उर्वरित वेळेत देशासाठी खेळतील, असेही या वृत्तात म्‍हटले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news